पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद (CISCE) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (10 वी) आणि आयएससी (12 वी) च्या परीक्षेचा निकाल आज (दि.१४) दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे. CISCE ने परीक्षेच्या निकालाची तारीख आणि वेळ संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांचे 10 वी आणि 12वीचे निकाल CISCE च्या cisce.org या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.
ICSE (10 वी) ची परीक्षा 27 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. तर ISC (12 वी) परीक्षा 13 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत झाली होती. या वर्षी सुमारे 2.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. आज दुपारी ३ वाजता या परिक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.
हेही वाचा :