Latest

ICC Suspends Sri Lanka : सरकारचा हस्तक्षेप श्रीलंका क्रिकेट संघाच्या अंगलट; आयसीसीकडून निलंबनाची कारवाई

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सरकारने केलेला हस्तक्षेप श्रीलंका क्रिकेट संघाच्या अंगलट आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) श्रीलंकन संघाचे निलंबन केले आहे. वनडे विश्वचषक २०२३ मध्ये श्रीलंकेने निराशाजनक कामगिरी केली. संघाला ९ पैकी ७ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. या खराब कामगिरीनंतर श्रीलंका सरकारने व्यवस्थापनामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला. सरकारचा हा हस्तक्षेप लक्षात घेत आयसीसीने निलंबनाची कारवाई केली आहे. (ICC Suspends Sri Lanka)

आयसीसीने काय म्हटले?  (ICC Suspends Sri Lanka)

गुरुवारी संसदेत सरकार आणि विरोधी पक्षांच्या संयुक्त ठरावात एसएलसी व्यवस्थापनाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर "श्रीलंका क्रिकेटचे आयसीसीचे सदस्यत्व तात्काळ निलंबित करण्यात आले आहे," असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे.
"आयसीसी आज (दि.१०) बैठक झाली. (ICC Suspends Sri Lanka)

आयसीसीने श्रीलंका क्रिकेट संघाचे निलंबन करताना सांगितले की श्रीलंका क्रिकेट एक सदस्य म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांचे गंभीर उल्लंघन करत आहे. विशेषतः व्यवहार स्वायत्तपणे व्यवस्थापित करण्याची आणि शासन, प्रशासनात कोणताही सरकारी हस्तक्षेप नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे. (ICC Suspends Sri Lanka)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT