Latest

ICC Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीचाही पाकला ठेंगा?

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अजूनही आशिया चषकाच्या यजमानपदावरून वाद करत आहे. या स्पर्धेचे यजमानपद त्यांना मिळाले आहे, मात्र बीसीसीआयने पाकिस्तानला संघ पाठवण्यास नकार दिला आहे. यानंतर पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी हायब्रीड मॉडेलवर स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव आशियाई क्रिकेट परिषदेला दिला. बांगला देश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डांनी हायब्रीड मॉडेल नाकारले आहे. दरम्यान, आता बातम्या येत आहेत की आयसीसी 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफीची जागा बदलली जाऊ शकते. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असेल. (ICC Champions Trophy)

2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानऐवजी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला मिळू शकते. यापूर्वी 2024 मध्ये वेस्ट इंडिज-ICC Champions Trophyअमेरिकेत होणारा टी-20 विश्वचषक इंग्लंडमध्ये हलवण्याची चर्चा होती. अमेरिकेतील क्रिकेटची मैदाने अद्याप आयसीसीच्या मानकांसाठी योग्य नाहीत. टी-20 विश्वचषक अमेरिकेतून हलवण्यात आल्याने त्याना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी एक वर्षाचा कालावधी मिळणार आहे. आयसीसी स्पर्धा रद्द केल्याच्या बदल्यात पाकिस्तानला काही नुकसानभरपाई मिळू शकते. (ICC Champions Trophy)

हेही वाचा; 

SCROLL FOR NEXT