Latest

मी सुरक्षा मागितलेली नाही, आम्ही लाचार नाही : संजय राऊत

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका जामिनावर सुटलेल्या राजा ठाकूर या गुंडाला मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (ठाकरे गट) यांनी केला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त यांना पत्र लिहित याबाबतची माहिती दिली असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

राऊत म्हणाले, मला सुरक्षा नको, आम्ही लाचार नाही. मात्र, मला विश्वसनीय सूत्रांकडून माझ्यावर होणाऱ्या हल्ल्याविषयी माहिती मिळत होती. माझे कर्तव्य आहे की, मी याबाबतची माहिती संबंधित जबाबदार व्यक्तींकडे कळवावी. त्यामुळे ही माहिती पत्राद्वारे कळवली आहे. मात्र, मला सुरक्षा नको, आम्ही लाचार नाही.

सत्तेत असलेल्या गटाचे खासदार धमक्यांची भाषा वापरतात. त्यासाठी गुंडाना तुरुंगातून सोडवले जात आहे. मात्र, मी सुरक्षा मागत नाही. मला सुरक्षा दिली नाही तरी चालेल. मी एकटा वाघ आहे. मात्र, या राज्यात सध्या काय सुरू आहे? तुमचे खासदार काय करत आहेत? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

अपात्र आमदाराने मुख्यमंत्रीपदाची शपथ योग्य आहे का? – अनिल परब

अपात्र असलेल्या आमदारांमध्ये एकनाथ शिंदे यांचेही नाव आहे. राज्यपालांनी अपात्र आमदार असलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देणे योग्य आहे का? असा सवाल कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला असल्याचे शिवसेना नेते अनिल परब (ठाकरे गट) यांनी स्पष्ट केले. उद्या ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद करणार आहेत. तर परवा शिंदे गटाचे वकिल सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद करतील.

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT