Latest

Hyderabad gangrape : हैदराबाद सामूहिक बलात्‍कार हा पूर्वनियोजित कटच, आरोपींनी केला कंडोमचा वापर

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
हैदराबादच्‍या जुबली हिल्‍स परिसरात झालेल्‍या सामूहिक बलात्‍कार प्रकरणी ( Hyderabad gangrape )  धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार हा पूर्वनियोजित कटच होता. कारण आरोपींनी अल्‍पमुलीवर अत्‍याचार करण्‍यापूर्वी कंडोमचा वापर केला. वैद्‍यकीय चाचणीमधून सुटण्‍यासाठी त्‍यांनी हा कट रचला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

१७ वर्षीय अल्‍पवयीन मुलीवर जुबली हिल्‍स परिसरात सामूहिक बलात्‍कार झाला होता. पार्टीनंतर घरी परतणार्‍या मुलींवर झालेल्‍या अत्‍याचाराचे प्रकरण उघडकीस आल्‍यानंतर हैदराबाद हादरले होते. याप्रकरणी एमआयएच्‍या आमदाराच्‍या अल्‍पवयीन मुलासह सहा जणांना ताब्‍यात घेण्‍यात आले आहे. अत्‍याचार करणार्‍या सहा आरोपींपैकी पाच अल्‍पवयीन आहेत.

Hyderabad gangrape : आराेपींनी केलेल्‍या कंडाेम खरेदीची हाेणार चाैकशी

'टाइम्‍स ऑफ इंडिया'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, याप्रकरणातील आरोपींनी सामूहिक बलात्‍कार करण्‍याचा पूर्वनियोजित कट रचला. वैद्‍यकीय चाचणीत आपले कृत्‍य उघड होवू नये यासाठी त्‍यांनी कंडोमचा वापर केला. आरोपींनी पबमध्‍ये जाण्‍यापूर्वीच कंडोमची खरेदी केली होती की, पबमधून बाहेर पडल्‍यानंतर याची चौकशी करण्‍यात येत आहे, असे पोलिस सूत्रांनी स्‍पष्‍ट केले.

सामूहिक बलात्‍कार प्रकरणातील आरोपींचे कॉल रेकॉर्ड गोळा करण्‍यात आले आहे. पोलीस चौकशीवेळी आरोपी जाणीवपूर्वक विसंगती ठेवत आहेत. आता कॉल रेकॉर्ड हाती आल्‍याने गुन्‍हा करण्‍यापूर्वी आरोपींमध्‍ये झालेल्‍या संभाषणावरुन पुढील चौकशी करण्‍यात येणार असल्‍याचेही पोलीस सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे. अल्‍पवयीन मुलींबरोबर आरोपींची मैत्री होती. याचा गैरफायदा घेत आम्‍ही तिच्‍यावर बलात्‍कार केला, अशी कबुली आरोपींनी दिली आहे. आता उस्‍मानिया जनरल हॉस्‍पिटलच्‍या वैद्‍यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. हा अहवालच या गुन्‍ह्यातील ठोस पुरावा असेल, असेही पोलिस सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे.

अल्‍पवयीन मुलीवर झालेल्‍या सामूहिक बलात्‍काराची व्‍हिडीओ क्‍लिप भाजपचे आमदार रघुनंदन राव यांनी शेअर केली होती. या क्‍लिपमध्‍ये अल्‍पवयीन मुलीवरील अत्‍याचारावेळी घटनास्‍थळी एमआयए आमदाराचा मुलगा दिसत होता. या प्रकरणी एमआयएम आमदाराच्‍या मुलाचा पोलिस बचाव करत आहेत, त्‍याच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यास दिरंगाई करत आहेत, असा आरोप रघुनंदन राव यांनी केला होता.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT