Latest

कोल्हापूर : मुलगा होत नाही म्हणून पत्नीला पेटवून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेप

backup backup

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : तीन मुलीनंतर मुलगा होत नसल्याने आई-वडिलांच्या चिथावणीवरून अंगावर रॉकेल ओतून पेटवून पत्नीला ठार मारणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश कोल्हापूर (वर्ग 1) श्रीमती एस आर पाटील यांनी पतीला जन्मठेप व सासू सासर्‍याला दोन महिने कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली.

पती अल्ताफ बुडेलाल उर्फ दादेसाब चमनशेख, सासरा बुढेलाल जीनसाब अमनशेख, सासू सरदारबी चमनशेख (रा. मुळ कुडची रायबाग) अशी आरोपींची नावे आहेत. ननंद महाबुबी तोफिक बदनकारी (रा. कुडची) न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

उंचगाव (जि. कोल्हापूर) येथील दबडे कॉलनी येथे ३० डिसेंबर २०१३ मध्ये रात्री नऊ वाजता ही घटना घडली होती. रॉकेल ओतून पेटवल्याने भाजून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा २ जानेवारी २०१४ मध्ये रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

तीन वर्षाची प्रत्यक्ष साक्षीदार असलेली मुलगी जिल्हा सरकारी वकील एडवोकेट विवेक शुक्ल यांचा युक्तिवाद आणि महिलेचा मृत्यूपूर्व जबाब ग्राह्य धरून न्यायालयाने पतीला जन्मठेप तर सासू, सासरा यांना दोन महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

अल्ताफ आणि शाहिस्ता यांचा विवाह २००७ मध्ये झाला होता. दाम्पत्याला तीन मुली झाल्याने पतीसह सासू सासरे शाहिस्तावर चिडून होते. या कारणातून पती-पत्नीमध्ये सातत्याने मतभेद होत होते. सासू-सासर्‍यांनी शाहिस्ताला मुलगा होत नसेल तर तिला मारून टाक अशी चिथावणी दिली होती. आणि त्याच दिवशी रात्री ही घटना घडली होती ९० टक्के भाजून गंभीर झालेल्या शाहिस्ताने मृत्यूपूर्व जबाबमध्ये पतीने पेटवून दिल्याचे म्हटले होते.

SCROLL FOR NEXT