यवतमाळ : घाटंजी येथील लोक अदालतमध्‍ये १४४० प्रकरणे निकाली; ३९ लाख ३९ हजार ६५४ रुपयाची वसुली..! | पुढारी

यवतमाळ : घाटंजी येथील लोक अदालतमध्‍ये १४४० प्रकरणे निकाली; ३९ लाख ३९ हजार ६५४ रुपयाची वसुली..!

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एफ. टी. शेख यांच्या हस्ते झाले. या वेळी घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर, ठाणेदार मनीष दिवटे (घाटंजी), ठाणेदार विनोद चव्हाण (पारवा), घाटंजी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड. अनंतकुमार पांडे, सचिव अँड. सादीक खान, अँड. पी. पी. राउत यांच्‍यासह आदीं मान्यवर उपस्थित होते.

घाटंजी येथील लोक अदालतीमध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणांपैकी १९९ प्रकरणे निकाली काढण्यात आले. त्यात ५ लाख २२ हजार २२७ रुपये एवढी रक्कम वसुल करण्यात आली. लोक अदालतीत उपस्थित सर्व बँक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, ग्रामपंचायत यासह इतर वादग्रस्त प्रकरणांपैकी १२४१ प्रकरणे निकाली काढण्यात आले. ३४ लाख १७ हजार ४२७ रुपये वसूल करण्यात आले.

 लोक न्यायालयात एकूण १४४० प्रकरणे निकाली काढण्यात आली. ३९ लाख ३९ हजार ६५४ एवढी रक्कम वसुल करण्यात आली. घाटंजी येथील लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एफ. टी. शेख, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, नाझर वाय. पी. ढलवार, पँनल अँड. भरवाडे, समाजसेविका सौ. जाचक, काँपींग लिपीक पी. एल. वाघाडे, व्ही. यु. उगेवार, एन. आर. तुरकर, बेलीफ हिवराज गजभिये या सह न्यायालयातील कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचलंत का?

Back to top button