Latest

Hruta durgule : परी तू अप्सरा…हृता तुझ्या घायाळ करणाऱ्या अदा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुलपाखरू फेम हृता दुर्गुळेने ( Hruta durgule ) एक हटके फोटोशूट केल्यामुळे तिची चर्चा सगळीकडे रंगलीय. पिवळ्या रंगाच्या वनपीसमध्ये हृताचा हा अंदाज प्रत्येकाला घायाळ करणारा आहे. तिला पाहून परी म्हणून की अप्सरा असे कमेंट आपसूकचं तोंडातून बाहेर पडताहेत. तिच्या सौंदर्याचं वर्णन तरी काय करावं. मराठमोळ्या हृताचा एक वेगळा चाहता वर्ग आहे.

मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पिवळ्या रंगाच्या वनपीसमधील तीन फोटो शेअर केले आहेत. केसांच्या स्टाईल, हातात घड्याळ, कानात इअररिग्स आमि मेकअपने तिच्या सौदर्यांत भर घातलीय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ❤️✨ हे दोन ईमोजी लिहिले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच 'Stunning ?❤️', 'Awww my ❤️❤️', 'outfit is glooming ❤️?', 'Wow ! ?', 'Uffffffff?', 'Beautiful ❤️❤️', 'Crush ??',' छान', 'कडक', 'Gorgeous?✨❤', 'mast ?❤️❤️ khup chan disteys…??❤️❤️', 'Awesome ❤️', 'परी तू अप्सरा, प्रिय हृता…' यासारख्या कॉमेन्टनी बॉक्स भरला आहे. यासोबत काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केल आहे. या फोटोला जवळपास ६५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत.

याआधी हृता दुर्गुळे पती प्रतिक शाहसोबत फीफी बेटावर सुट्ट्यांचा आनंद घेण्यास गेली होती. येथील हॉट फोटोज आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. हृता आगामी 'अनन्या' आणि 'टाइमपास ३' या चित्रपटात दिसणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने तिने 'कन्नी' या चित्रपटाची घोषणा केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT