Latest

एकाच स्मार्टफोनवर WhatsApp ची दोन अकाउंट कशी वापराल? , जाणून घ्या सोपी पद्धत!

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

आज बहुतांश अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये ड्युअल-सीम सपोर्ट आहे. यामुळे युजर्संना एकाच डिव्हाइसवर दोन वेगवेगळे नंबर वापरण्याची सुविधा आहे. तसेच तुम्ही आता एकाच स्मार्टफोनवर WhatsApp ची दोन अकाउंट वापरु शकता. Xiaomi, Samsung, Vivo, Oppo, Huawei आणि Honor सारख्या कंपन्या आता 'ड्युअल ॲप्स' किंवा 'ड्युअल मोड' फीचर ऑफर करत आहेत. ज्यामुळे युजर्संना एकाच चॅट ॲपची दोन वेगळी अकाउंट वापरता येतात. याचा अर्थ असा की, तुम्हाला दोन व्हॉटस ॲप अकाउंट्साठी दोन स्मार्टफोन्सची गरज नाही; पण हे कसे वापरावे ते आपण पाहुया…

विविध कंपन्यांचे मोबाईल आणि त्यांचे फीचर

सॅमसंग (Samsung) : Dual Messenger
शाओमी Xiaomi (MIUI) : Dual apps
Settings > Dual Apps
व्हिवो Vivo : App clone
Settings > App clone
ओपो Oppo : Clone Apps
Settings > Clone Apps

 स्मार्टफोनवर Dual WhatsApp फीचर कसे वापरायचे ते आपण पाहू…

  • तुमच्या स्मार्टफोनवरील ड्युअल ॲप्स सेटिंग्ज ऑप्शन ओपन करा.
  • ॲप निवडा जे तुम्हाला duplicate करायचे आहे (यात WhatsApp निवडा)
  • finish प्रक्रिया होईपर्यंत वाट पहा.
  • आता, होम स्क्रीनवर जा आणि तुम्हाला तुमच्या ॲप लाँचरमध्ये दिसत असलेल्या दुसऱ्या WhatsApp लोगोवर टॅप करा.
  • दुसरा फोन नंबर वापरून कॉन्फिगर (Configure) करा आणि पुढे जा.

काही फोन असे आहेत जे Android One डिव्हाइसेस आणि जे 'stock' Android ऑफर करतात; पण ते ड्युअल ॲप फिचर्ससह येत नाहीत. यासाठी Google Play Store गुगल प्ले स्टोअरवर Parallel, Dual App Wizard, DoubleApp  असे आणखी काही बरंच ॲप्स उपलब्ध आहेत. युजर्स ती ॲप्स डाउनलोड करुन एकाच स्मार्टफोनवर एकाच चॅट ॲपची दोन अकाउंट वापरु शकतात.

हेही वाचलं का?

पाहा व्हिडिओ : 14 वर्षांच्या अथर्वचा भन्नाट डान्स व्हायरल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT