Latest

Testy Bread Roll : शिळ्या ब्रेडपासून असा बनवा टेस्टी ब्रेड रोल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेकदा घरामध्ये ब्रेड तसाच पडून राहतो. कधी कधी आपण त्या ब्रेडचे तुकडे अथवा चिवडा बनवतो. (Testy Bread Roll) पण, तुम्हाला याच ब्रेडपासून बनवलेला टेस्टी पदार्थ खायला मिळाला तर! चला तर मग पाहुया शिळ्या ब्रेडपासून टेस्टी ब्रेड रोल कसा बनवायचा? (Testy Bread Roll)

साहित्य :

ब्रेड

बारीक चिरलेला कांदा

उकडलेले बटाटे

हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या

मैदा

लाल तिखट

हळद

मीठ

गरम मसाला

तळण्यासाठी तेल

कृती :

सर्वप्रथम बटाटे उकडून घ्यावे. दुसरीकडे ताजा किंवा शिळा ब्रेडचे चारी बाजूने काठ काढून घेऊन बाजूला ठेवून द्या. आता एका मोठ्या बाऊलमध्ये बटाटे कुसकरून घ्या. त्यात १ कांदा बारीक चिरलेला, हिरवी मिरची बारीक कापलेली, हळद, मीठ, गरम मसाला, हवे तेवढे मीठ घालून सर्व पदार्थ मळून घ्या.

दुसरीकडे ब्रेडचे चारी काठ चाकून कट करून घ्या. पोळपाटावर एक ब्रेड घेऊन तो हलक्या हाताने लाटून घ्या, ज्यामुळे ब्रेडचा बेस घट्ट होईल. आता दुसऱ्या बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यात थोडे पाणी घालून मध्यम पातळ तयार करा. (झुणक्याची पोळीला जसे पीठ तयार करतो तसे)

आता कांदा, बटाटा, मिरचीचे तयार केलेले मिश्रण थोडे हातात घेऊन त्याचे मुटके तयार करून घ्या. जेणेकरून ब्रेडमध्ये हे मुटके गुंडाळता येईल. आता ब्रेडवर मैद्याचे पातळ पीठ चमच्याने पसरवून घ्यावे. तयार मुटका ब्रेडवर ठेवून त्यांचे रोल बनवून घ्यावे. दुसरीकडे गॅसवर एक कढई घेऊन त्यात तळण्यासाठी तेल गरम करून घ्यावे. तेलामध्ये ब्रेड रोल हळूवार सोडून सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घ्यावे.

SCROLL FOR NEXT