Latest

Masala Bhindi Recipe : कोवळ्या भेंडीपासून बनवा ‘मसाला भेंडी’ रेसिपी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोजच्या जेवणातील भाजी आपण खाऊन कंटाळलेलो असतो. घरातील मुले तर भेंडीची भाजी म्हटलं तरी नाक मुरडतात. पण, तुमच्याकडे जर कोवळ्या भेंड्या असतील तर घरातल्या सर्वच मंडळींना आवडणारी मसाला भेंडीची रेसिपी (Masala Bhindi Recipe) नक्की ट्राय करून पाहा. बनवायचा सोपी आणि खायला टेस्टी मसाला भेंडीची रेसिपी तुम्ही सातत्याने कराल.  (Masala Bhindi Recipe)

साहित्य –

कोवळी भेंडी पाव किलो

कांदे

टोमॅटो प्युरी

जिरे

हळद – अर्धा चमचा

लाल तिखट – १ चमचा

आले लसूण पेस्ट

मीठ – चवीनुसार

आमचूर पावडर

धने पावडर
जिरे पावडर

तेल

मिरची – १ बारीक कट करून

कृती –

भेंडी स्वच्छ धुवून ती कापडाने पुसून घ्या. आपण नेहमी भेंडी कापतो, तसे बारीक तुकडे न करता मध्यम तुकडे करा.

एका कढईत तेल गरम करायला गॅस शेगडीवर ठेवा. त्यात भेंडी परतवून घ्या. आता दुसऱ्या एका कढईत तेल टाकून त्यात जिरे टाका. कापलेला कांदा आणि मिरची टाकून परतवून घ्या. यात आले-लसूण पेस्ट भाजून घ्या. कांदा थोडा तांबूस झाला की, त्यात टोमॅटो प्युरी, मीठ, हळद, लाल तिखट, धने पावडर, आमचूर, जिरे पावडर घालून भाजून घ्या. आता यामध्ये भेंडी टाकून परतवून घ्या. पाणी अजिबात घालू नका. मंद आचेवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या.

तयार झाली मसाला भेंडी रेसिपी. गरमा गरम चपाती किंवा भाकरीसोबत खायला घ्या.

SCROLL FOR NEXT