Latest

Mix Lonche : पावसाळ्यासह वर्षभर टिकणारे बनवा चटपटीत कैरीचे मिक्स लोणचं

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : कडक उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाला उन्हाच्या झळा सहन कराव्या लागतात. उन्हाळ्यात थंडगार शीतपेय पिण्याकडे सर्वांचाच कल वाढतो. तर महिला वर्गाची वर्षभरासाठी चटणी, वेगवेगळे उपवासाचे पापड, लोणचे, सांडगे, शेवया या पदार्थ बनवण्याकडे कल असतो. अशावेळी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे मिळते. मात्र, जर घरीच मिक्स कच्या कैरीचं लोणचं बनवण्यासाठी जाणून घ्या सोपी रेसीपी… ( Mix Lonche )

साहित्य-

कच्ची कैरी- २ नग
हिरव्या मिरच्या- १४-१५ नग
लिंबू- २ नग
गाजर – २ नग
आवळा- पावशेर
मुळा- छोटे २ नग
जिरे- १ चमचा
मोहरी किंवा मोहरी डाळ – १ चमचा
आले- छोटे ५-६ काप
लसूण- दोन गड्डे
व्हिनेगर – १ चमचा
हळद- १ चमचा
लाल तिखट- २ चमचा
बडिशेप – १ चमचा
हिंग- चवीनुसार
मेंथी दाणे- अर्धा चमचा
मीठ- चवीनुसार
तेल- २०० ग्रॅम

कृती-

१. प्रथम कच्ची कैरी, गाजर, आवळे, हिरवी मिरची, लिंबू, मुळा हे सर्व स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यावे.

२. यानंतर कच्च्या कैरीतील मध्यभागी असणारी कोय काढून छोटे- छोटे बारिक तुकडे करून घ्यावेत.

३. गाजर, मुळा, लिंबू, आल्याचे छोटे- छोटे तुकडे करावेत. हिरवी मिरची मधोमध चिरून घ्यावी आणि आवळेचेही दोन समान भाग करावेत. (टिप- आवळ्यामधील बी काढले तरी चालते.)

४. कच्च्या कैरीचे काप ३-४ तास कडक उन्हात वाळवेत.

५. गॅसवर कढईत ठेवून त्यात बडिशेप, जिरे, मोहरी किंवा मोहरीची डाळ आणि मेंथी दाणे मंद आचेवर भाजून घ्यावे. (टिप- हे मिश्रण फार जास्त वेळापर्यत गॅसवर ठेवू नये.)

६. वरील सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात घालून बारिक करून घ्यावे.

७. उन्हात ठेवलल्या कैरीच्या सर्व फोडी एका पसरट भांड्यात घ्याव्यात. यानंतर त्यात चिरलेले गाजर, मुळा, लिंबू, आले, हिरवी मिरची, लिंबू याचे सर्व काप एकत्रित करावेत.

८. या मिश्रणात लसूण, हळद, लाल तिखट, अर्धा चमचा हिंग, मीठ, मिक्सरमधील बारीक केलेला मसाला, व्हिनेगर घालावे.

९. यानंतर शेवटी तेल गरम करून थोड्या वेळापर्यत थंड करत ठेवावे.

१०. तेल थोडे थंड झाल्यावर या मिश्रणात घालून एकत्रित करावे.

११. यानंतर एका मातीच्या किंवा काचेच्या स्वच्छ बरणीत भरावे.

१२. यानंतर तयार होईल चटपटीत कैरीचं मिक्स लोणचं. ( Mix Lonche )

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.