Latest

Egg-Kheema Curry : चरचरीत अंडा-खिमाकरी कशी कराल? 

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या कडाक्याच्या थंडीचे दिवस सुरू आहेत. या दिवसांत अनेक खवय्ये मांसाहारावर जास्त भर देत असतात. मांसाहारप्रेमी खाण्याचे इतके शौकिन की, जेवणाच्या शेवटी बोटं चाटत राहतात. त्यामुळे मांसाहारप्रेमींसाठी वेगळी रेसिपी पाहणार आहे. त्या रेसिपीचं नाव आहे अंडा-खिमाकरी. ही रेसिपी जेवढी टेस्टी असते तितकीच ती बनवायलादेखील सोपी असते. चला तर अंडा-खिमाकरीची रेसिपी पाहूया… (Egg-Kheema Curry)

अंडा-खिमाकरीचे साहित्य

१) पावशेर मटणाचा खिमा
२) चार उकडलेली अंडी
३) पावशेर हिरवा मटर
४) तीन चमचे तेल
५) एक चमचा आलं-लसूण पेस्ट
६) अर्धा कप टोमॅटो प्यूरी
७) अर्धा कप बारीक चिरलेला कांदा
८) दोन लाल मिरच्या, दोन तमालपत्र
९) अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हळद
१०) अर्धा चमचा मिरची पावडर आणि धने पावडर
११) अर्धा चमचा गरम मसाला आणि मटण मसाला
१२) चार चमचे बारीक कापलेली कोथिंबीर

अंडा-खिमाकरीचे कृती

१) सर्वांत पहिल्यांदा गॅसच्या आचेवर कढई ठेवून तेल गरम करून घ्या. त्या गरम झालेल्या तेलात जिरे, तमालपत्र आणि लाल मिरच्या घाला.

२) त्यानंतर आलं-लसूण पेस्ट टाकून गरम करून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून ब्राऊन रंग प्राप्त होईपर्यंत तेलात परतून घ्या.

३) कांदा परतल्यानंतर त्यात टोमॅटो प्यूरीदेखील हलकेपणा परतवा. जेव्हा पेस्ट तेलापासून बाजूला होईल तेव्हा खिमा टाका आणि ५ मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घ्या.

४) त्यानंतर एक पाणी टाका आणि कढईवर झाकण ठेवून पुन्हा ५ मिनिटं शिजवून घ्या. जेव्हा खिमा तेलापासून बाजूल होताना दिसेल तेव्हा मटर आणि शिजवलेली अंडी घाला.

५) नंतर हे सर्व पदार्थ किमान ७ मिनिटं शिजवून घ्या. हे शिजत असताना मधेमधे चमचा घालून मटर शिजले की नाहीत, पाहून घ्या.

६) जेव्हा कढईतील ग्रेव्ही घट्ट होऊ लागेल तेव्हा गॅस बंद करा आणि त्यात गरम मसाला, कोथिंबीर मिक्स करून घ्या.

अशाप्रकारे तुमची खमंग अंडा-खिमाकरी (Egg-Kheema Curry) तयार झाली. ही गरमा-गरम अंडा-खिमाकरी तंदूर रोटी किंवा जिरा राईसबरोबर खाऊ शकता.

व्हिडीओ पहा : आठ दिवस टिकणाऱ्या मटण लोणच्याची रेसिपी

या रेसिपी वाचल्या का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT