Latest

Navratri Fasting : नवरात्रीच्या उपवासासाठी टेस्टी भगरीच धिरड जरूर ट्राय करा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवरात्रीच्या काळात माहिला वर्ग देवीचे व्रत म्हणून नऊ दिवस उपवास ( Navratri Fasting ) करतात. या काळात खिचडी, शाबूदाण्याचे वडे, खजूर, अनेक फळांचे सेवन केलं जाते. परंतु, वेगळं असं उपवासादिवशी नाश्त्यासाठी काय करावं? हा प्रश्न अनेकांना पडतो. अशा वेळी वरईची किंवा भगरीच धिरड हा टेस्टी पर्याय तुमच्यासमोर आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भगरीच्या धिरड्याची सोपी रेसिपी..

संबधित बातम्या  

साहित्य :

वरई / भगर : १ वाटी

शाबुदाणा : पाव वाटी

बटाटे : २ (साल काढलेले )

भाजलेले शेंगदाणे : अर्धा वाटी

मिरच्या : ५ ते ६ बारीक चिरून

कोथिंबीर

मीठ – चवीनुसार

कृती :

सर्वप्रथम वरी आणि शाबुदाणा पाण्यातून धुवून घ्या. त्यात पुन्हा पाणी घालून अर्धा तास भिजवत ठेवा. त्यानंतर बटाटे खिसून घ्या. त्यानंतर भिजवलेली वरी आणि शाबुदाना, कोथिंबीर, शेंगदाणे, बटाटे, मिरच्या आणि मीठ मिक्स करून घ्या. गरज लागल्यास थोडं पाणी घालून बॅटरची constistancy चेक करून घ्या.

आता हे धिरड घालण्यासाठी तवा गरम करून घ्या. त्यावर बाजूने तूप सोडाव. आता धिरड्याच बॅटर त्यावर घालावं. १ ते २ मिनिटांसाठी धिरड्यांवर झाकण ठेवून वाफवून घ्यावं. १ ते २ मिनिटानंतर झाकण बाजूला करून दुसरी बाजू शेकून घ्यावी. दोन्ही बाजू पूर्ण भाजून झाल्यानंतर दही, लोणी किंवा तुपासोबत खावं. ( Navratri Fasting )

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT