Latest

mparivahan app : वाहनाची कागदपत्रे नाहीत काळजी नसावी, हे ॲप डाऊनलोड करा चलन कापण्यापासून मुक्त व्हा

backup backup

mparivahan app : आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक ठिकाणी दोन चाकी आणि चार चाकी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आपण कोणत्याही ठिकाणी जाताना वाहनांचा वापर करतोच. दरम्यान बाहेर जाताना आपण वाहनांची कागदपत्रे घेऊन जाणे खूप महत्वाचे असते. दरम्यान आपल्यासोबत सर्व कागदपत्रे असणे हे महत्वाचे असते.

ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, पीओसी वाहनधारक प्राथमीक पातळीवर ही कागदपत्रे सोबत घेऊन जातात, पण कधी कधी ते हरवण्याची चिंताही मनात कायम असते.

पण हीच कागदपत्रे सोबत न घेतल्यास आपल्याला ट्रॅफिक पोलिस चांगलाच खिशाला खड्डा पाडू शकतात. अशा परिस्थितीत एम-ट्रान्सपोर्ट हे ॲप खिशाला खड्डा पाडण्यापासून वाचवू शकते.

mparivahan app : या ॲपमध्ये तुमची कागदपत्रे डिजीटल पद्धतीने ठेवू शकता

एम ट्रान्सपोर्ट ॲपमध्ये तुम्ही कागदपत्रे डिजिटली पद्धतीने ठेवू शकता. यामुळे तुम्ही वाहनांची कागदपत्रे तुमच्या वाहनाची कागदपत्रे तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता.

याबाबत जाणून घेऊया…

एम-परिवहन ॲप्लिकेशन रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने लॉन्च केले आहे. याद्वारे नागरिक ऑनलाइन पद्धतीने याचा वापर करू शकतात. या ॲपमध्ये तुम्हाला जवळ असणारे प्रदूषण तपासणी केंद्र, जवळचे RTO, DL मॉक टेस्ट अशा अनेक सुविधा मिळतात.

गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप उपलब्ध

सर्वप्रथम, तुम्हाला Google Play Store वरून M-Parivahan हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. दरम्यान हे अप लाल रंगाचे असेल.

ॲप डाउनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरसह त्यावर साइन अप करावे लागेल आणि नंतर लॉग इन करावे लागेल. यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल.

यानंतर या ॲपचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल.

जिथे तुम्ही तुमच्या वाहनाशी संबंधित सर्व कागदपत्रे जसे की RC, DL, POC इत्यादी ठेवू शकता.

SCROLL FOR NEXT