Latest

मुंबईत लव्ह जिहादविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा

अविनाश सुतार

मुंबई: पुढारी वृत्तसेवा – सकल हिंदू समाजाच्या वतीने दादर शिवाजी पार्क ते प्रभादेवी कामगार स्टेडियमपर्यंत भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चा आज (दि.२९) काढण्यात आला. धर्मांतर, लव्ह जिहाद आणि लॅन्ड जिहाद विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करावा, या मागणीसाठी हजारो हिंदू बांधव-भगिनी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. मोर्चात भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, गोपाळ शेट्टी, आमदार नितेश राणे, सदा सरवणकर, प्रसाद लाड, वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह बजरंग दल आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. त्याचबरोबर लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींचे कुटुंब आणि काही पीडितांनी मोर्चात हजेरी लावली होती.

शिवाजी पार्क येथील सेनाभवनपासून मोर्चाला सुरुवात झाली. हातात फलक भगवे झेंडे घेऊन मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. एक ही नारा, एक ही नाम… जय श्री राम … जय श्री राम, जय भवानी … जय शिवाजी…, हर हर महादेव …, बंद करो .. बंद करो लव्ह जिहाद बंद करो.. अशा गगनभेदी घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला.

हिंदू आक्रोश मोर्चातील वाढती संख्या पाहता सेना भवन ते प्रभादेवी पर्यंत रस्त्यावरील वाहतूक दुसऱ्या रस्त्यावरून वळविण्यात आली. संपूर्ण वातावरण भगव्या रंगात न्हाऊन निघाले होते. हातात भगवे झेंडे घेतलेले बांधव रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी करत होते. प्रभादेवी कामगार स्टेडियम मधील व्यासपीठावर सनातन धर्म श्री राम युवा सेनेचे अध्यक्ष राजसिंह ठाकूर यांना पाहताच मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकरात जिहादी शक्तीविरोधात संताप उफाळून आला. जमलेल्या हिंदू बंधू-भगिनींचे समर्थन पाहून त्यांनी हात उंचावून मोर्चेकरांचे आभार मानले.

व्यासपीठावर हिंदू सकल समाजाच्या मनीषा भोईर, साक्षी गायकवाड, भाजपच्या अक्षता तेंडुलकर, करिष्मा भोसले यांच्यासह राष्ट्र पुरुषांचे वेष परिधान केलेली चिमुरडी उपस्थित होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT