Latest

Heavy Rainfall | येत्या तीन दिवसांत ‘या’ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय हवामान विभागाने (IMD) झारखंडसह अनेक राज्यांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचा सामना करण्यासाठी अनेक राज्य तयारीत आहेत. दरम्यान आज (दि.४) ईशान्येकडील सिक्कीममध्ये ढगफुटी झाली असून, लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाले आहेत. तर मंगळवारी (दि.३) रात्री कन्याकुमारीमध्ये विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू झाला. (Heavy Rainfall)

आग्नेय-पूर्व झारखंडवरील कमी दाबाचे क्षेत्र येत्या दोन ते तीन दिवसांत पश्चिम बंगालमध्ये जवळजवळ पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे जवळपासच्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.  (Heavy Rainfall)

Heavy Rainfall : 'या' राज्यांमध्ये जोरदार पाऊस

येत्या तीन दिवसांत बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि उत्तर ओडिशा येथे आणि पुढील चार दिवसांत ईशान्य भारतात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड आणि उत्तर ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये शुक्रवारपर्यंत (दि.६) जोरदार पाऊस पडू शकतो, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

केरळसह दक्षिणेतील शहरांना ऑरेंज अलर्ट

मंगळवारी केरळच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. आजही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय तिरुअनंतपुरममध्ये मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने येथील जिल्हा प्रशासनाने ४ ऑक्टोबर रोजी शाळांसह शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. कोल्लम, पठाणमथिट्टा आणि अलप्पुझा जिल्ह्यांमध्ये पिवळा अलर्ट जारी केला आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे कन्याकुमारीमध्ये अग्निशमन आणि बचाव सेवांचे 150 हून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, काल रात्री अत्तूरजवळ विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT