Latest

ठाणे जिल्ह्यात मुसळधार; नद्यांनी धोक्‍याची पातळी गाठली; कांबा येथील ६० कुटुंबांचे स्‍थलांतर

निलेश पोतदार

ठाणे : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पहाटेपासून धुवाधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील दोन महत्वाच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासनाने नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उल्हास आणि काळू नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. तर उल्हास नदीवरील अंबरनाथ मधील पुलावरून पाणी वाहू लागले आहे.

अंबरनाथ तालुक्यात सर्वाधिक ११४ मि मी पाऊस पडला असून, उल्हासनगर तालुक्यात ११० मी मी, ठाणे ७५, कल्याण ९८, मुरबाड ६३ मी मी, भिवंडी ७९ मि मी, शहापूर ५३ मिमी पावसाची नोंद झाली. रायते ते दहागाव मार्गावरील उल्हास नदीवरील पुलावर पाणी गेले आहे.
मुरबाड तालुक्यातील चिखले गावाला जाणाऱ्या काळू नदीवरील पुलावर पाणी आले आहे. मुरबाड येथील मुरबाडी नदीवरील पुलावरूनही पाणी जात आहे. प्रत्येक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन व महसूल यंत्रणा कार्यरत आहेत. कल्याण तालुक्यातील मोरया नगर, कांबा येथील 60 कुटुंबांना हलविण्यात आले आहे. बदलापूर आणि अंबरनाथ दरम्यान रेल्वे रुळावर पाणी आले आहे. बरनाथ येथील सहवास वृद्धाश्रम मधील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT