Latest

Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा मुसळधार; ‘या’ भागात उद्यापासून पावसाचा कहर

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पाऊस वाढणार आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण असून, गार वारे सुटले आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे.

21 सप्टेंबरपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. मंगळवारी बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भासह कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भ, मराठवाड्यात 21 ते 23, तर मध्य महाराष्ट्रात 22 ते 23 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर जास्त राहणार आहे.

…असे आहेत अलर्ट

  • विदर्भ : 21 ते 23 मुसळधार
  • मराठवाडा : 21 ते 23 मुसळधार
  • मध्य महाराष्ट्र : 22 व 23 मुसळधार (घाटमाथा)
  • कोकण : 21 व 22 मुसळधार

हेही वाचा

SCROLL FOR NEXT