Latest

पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस; लवासा, लोणावळा, निमगिरी, माळीणमध्ये अतिवृष्टी

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात बहुतांश तालुक्यांत गेल्या चोवीस तासांत मुसळधार पाऊस झाला असून, लवासा, लोणावळा, निमगिरी व माळीणमध्ये अतिवृष्टीची नाेंद झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस सुरू असून, घाटमाथ्यावर अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या चोवीस तासांत लवासा भागात अतिवृष्टीची नोंद झाली. तेथे १०५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्या पाठोपाठ लोणावळ्यात ९४.२, निमगिरीत ८१, तर माळीणमध्ये ६१ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली.

२४ तासांत जिल्ह्यात पडलेला पाऊस (मि.मी.मध्ये)

लवासा – १०५.५, ला्ेणावळा – ९४.४, निमगिरी – ८१.५, गिरीवन – ७३.५, माळीण – ६०.५, खेड – ३८,तळेगाव – २४.५, राजगुरूनगर – २३.५, नारायणगाव – १४, डुडुळगाव – ८.५, हवेली – ४.५, चिंचवड – १८.५, शिवाजीनगर – २०.४

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT