Latest

Heart Health : हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावे? CPR सह ‘हा’ प्राथमिक उपाय करा

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Heart health जागतिक हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! हृदयविकाराचा झटका येणे किंवा हृदयाशी संबंधित अन्य आजार हे आजच्या Life Style मध्ये अतिशय सामान्य आणि तितकीच गंभीर समस्या बनले आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणालाही केंव्हा ही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्याच प्रमाणे हृदयाशी संबंधित अन्य विकारांचे देखिल प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आज अचानक हृदयविकाराचा झटका येऊ नये आणि समजा एखाद्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला तर अशा प्रसंगी हा साधा आणि छोटा उपाय करू शकता.

Heart health सामान्यपणे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दवाखान्यात नेईपर्यंत रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR – छातीवर जोरजोरात दाब देणे) दिले तर रुग्णाचे प्राण वाचते. त्याच प्रकारे अशा रुग्णांचे रुग्णालयात नेईपर्यंत प्राण वाचवण्यासाठी आणखी एक साधा उपाय आहे. मुद्रा रहस्य किंवा मुद्रा शास्त्राप्रमाणे अशा अनेक मुद्रा आहेत ज्या उपचारक मुद्रा असतात. त्यापैकीच एक मुद्रा म्हणजे 'अपानवायू मुद्रा' होय. या मुद्रेला 'मृत संजिवनी' मुद्रा देखिल म्हटले जाते. कारण ही मुद्रा कमी वेळेत आपला प्रभाव दाखवते. वायू मुद्रा आणि अपान वायू मुद्रा या दोन्ही मुद्रांचे फायदे यातून आपल्याला मिळतात.

Heart health अचानक आलेला हृदयविकाराचा झटका, एंजाइना, उच्च आणि निम्न रक्तदाब इत्यादी रोग बरे होतात. इन्जेक्शन किंवा सोरिबिट्रेट दवा याप्रमाणे याचा परिणाम होतो. या मुद्रेमुळे भीती, हृदयाची गती मंदावणे, हृदयाची धडकन चूकणे, पोटातील गॅस हृदयापर्यंत पोहचल्याने होणा-या वेदना, दमा अशा आजारांमध्ये ही मुद्रा सकाळ संध्याकाळ 15-15 मिनिटे ही मुद्रा लावावी. यामुळे हृदय कायम सुदृढ राहते. तसेच या मुद्रेचा दररोज सराव केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याच्या शक्यता कमी होतात. या व्यतिरिक्त देखिल या मुद्रेचे अनेक फायदे होतात.

Heart health अशी लावा ही मुद्रा

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्या रुग्णाच्या दोन्ही हातांच्या बोटाने अपान वायू मुद्रा लावा. अंगठा आणि हाताची मधल्या दोन बोटांचा (माध्यमिका आणि अनामिका) अग्रभाग वरचे टोक हलके जुळवा आणि तर्जनी (अंगठ्या जवळचे पहिले बोट) हे अंगठ्याच्या खालच्या भागात म्हणजे जिथे अंगठा संपतो तिथे लावा. करंगळी सरळ ठेवा. रुग्णालयात नेईपर्यंत बोटांची स्थिती अशीच राहू द्या. जेणेकरून उपचारापूर्वी रुग्ण दगावणार नाही. मुद्रा कशी लावावी हे अधिक स्पष्ट जाणून घेण्यासाठी खालील फोटो पाहा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT