Latest

मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवर ‘सुप्रीम’ सुनावणी पूर्ण

मोहन कारंडे

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर इन चेंबर सुनावणी पार पडली. यासंदर्भात लवकरच निकाल अपेक्षित आहे. कारण, त्यावरच मराठा आरक्षणाचे भवितव्य अवलंबून आहे. राज्य सरकारने या सुनावणीत आपली भूमिका मांडली.

या क्युरेटिव्ह याचिकेवर तीन प्रकारे निकाल लागण्याची शक्यता आहे. पहिल्या शक्यतेनुसार, ही क्युरेटिव्ह याचिका फेटाळली जाऊ शकते. असे झाल्यास मराठा आरक्षण न्यायालयातून मिळण्याची शक्यता मावळणार असून, संसदेवर अवलंबून राहावे लागेल. दुसऱ्या शक्यतेनुसार, क्युरेटिव्ह याचिकेमध्ये या प्रकरणातील प्रतिवादी जयश्री पाटील यांना त्यांची भूमिका मांडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालय देऊ शकते. तिसऱ्या शक्यतेनुसार, खुल्या न्यायालयात सुनावणी केली जाईल, असे सांगून सर्वोच्च न्यायालय सुनावणीची तारीख देऊ शकते. मराठा आरक्षणासाठीचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी तशी मागणी केली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT