Latest

“…तर मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार” – हसन मुश्रीफ (Video)

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : "हे तर निव्वळ माझ्या बदनामीचे षडयंत्र.  माझ्‍याविरोधातील एक आरोप खरा ठरला तर मी  आमदारकीचा राजीनामा देईन. शेतकऱ्यांच्या मालकीच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बदनाम करण्याचे पाप करू नका." असं ट्विट करत हसन मुश्रीफ यांनी दोन मिनिटे वीस सेकंदाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे."

(Hasan Mushrif Tweet ) भाजप नेते किरीट सोमय्या यांनी  हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप काही दिवसांपूर्वी केले होते. हे आरोप मुश्रीफ यांनी वेळोवेळी फेटाळून लावले आहेत. दोघांमध्‍ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. आज (दि.९) मुश्रीफ यांनी व्हिडीओ ट्विट करत हे आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावले.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर काही दिवसांपूर्वी सक्‍तवसुली संचालनालय ('ईडी') छापे टाकले होते. त्यानंतर 'ईडी'च्या अधिकार्‍यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेवरही छापे टाकले. आज (दि.९) हसन मुश्रीफ यांनी  ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आरोप सिद्ध झाले तर मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे.

Hasan Mushrif Tweet : शेतकरी यांना माफ करणार नाही

व्‍हिडिओमध्‍ये मुश्रीफ यांनी म्‍हटलं आहे की,  ४० हजार शेतकऱ्यांच्या नावावर १० हजार प्रमाणे घेतलेले  शेअर ते कारखान्याच्या उभारण्यासाठी खर्च केले असतील तर ठेव ठेवण्याची काय गरज होती. शासनाकडून एक पैशाचही अनुदान खाजगी कारखान्याला मिळत नाही. याची सुद्धा सोमय्‍यांना  माहीती नसावी. त्‍याचेच मला आश्चर्य वाटतयं. माझी बदनामी करण्यासाठी हे षडयंत्र सुरु आहे. काही दिवसातचं या पाठीमागील बोलवते धनी यांना आम्ही उघड केल्याशिवाय राहणार नाही. सातत्याने माझ्यावर कोणतेही वैयक्तिक आरोप करु देत, पण जिल्हा मध्यवर्ती बॅंक आम्ही रक्त आठवून केली आहे. आज राज्यात सर्वत्र याचा गवगवा आहे. त्याला बदनाम करण्याच काम ही मंडळी करत आहेत. शेतकरी यांना माफ करणार नाहीत. असा इशाराही त्‍यांनी दिला.

छापे टाकण्याचे जागतिक रेकॉर्ड होईल

एक पैशाचाही मी स्वत: कर्ज घेतलेले नाही.  माझ्या नातेवाईकांनाही घेवू दिलेलं नाही. कारखान्यात बेकायदेशीर कर्ज दिलेलं नाही. आणि म्हणून यातली कुठली गोष्ट सिद्ध केली तर मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. यापुढे त्यांनी व्यव्यस्थित माहिती घ्यावी आणि मी विनय कोरे, शिंदे गट भाजप यां संचालक मंडळ तसेच आमचे युनियनचे पदाधिकारीही भेटणार आहेत. त्यांचे जे काही गैरसमज असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करतील. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची बदनामी आम्ही कदापी सहन करणार नाही.  कर्जामध्ये कोणताही संबंध नसताना फक्त यांच्या आरोपापोटी छापे घालण्याचे जागतिक रेकॉर्ड होईल. माझे कुटूंबीय, नातेवाईक माझे, मित्रमंडळी, संबंधित यांच्यावर इन्कम टॅक्सची त्यानंतर ईडी असे सातत्याने छापे टाकले जात आहेत मला वाटत हे जागतिक रेकॉर्ड होईल, असा टोलाही त्‍यांनी लगावाला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT