Latest

Haryana Violence : ‘अधिकारी प्रत्येकाचे रक्षण करू शकत नाही’; हिंसाचारावर हरियाणाचे CM ‘खट्टर’ यांचे विधान

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Haryana Violence : आम्ही प्रत्येकाचे रक्षण करू शकत नाही, असे मोठे विधान हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आज बुधवारी पत्रकार परिषदेत केले आहे. हरियाणाच्या नूह येथे सोमवारपासून उफाळलेल्या हिंसाचारावर बुधवारी पत्रकार परिषदेत संबोधन केले. यावेळी त्यांनी राज्यात शांतता आणि सलोखा राखणे महत्वाचे आहे. यासाठी त्यांनी जनतेला आवाहन केले आहे. मात्र, अधिकारी देखील प्रत्येकाचे संरक्षण करू शकत नाहीत. तसेच पोलिस किंवा सैन्य कोणीही याची हमी देऊ शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

हरियाणातील नूह येथे सोमवारी (दि.३१) विश्व हिंदू परिषदेच्या जलाभिषेक यात्रेदरम्यान जमावाने रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिथे हिंसाचार उसळला. दोन्ही गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाली आणि गाड्या पेटवण्यात आल्या. याचे पडसाद गुढगाव, पलवाल या शहरातही उमटले. तणावपूर्ण परिस्थितीनंतर मंगळवारी काही शहरात शाळा बंद ठेवण्यात आले. तर कलम १४४ लागू करून नूहमध्ये इंटरनेट देखील बंद करण्यात आले. (Haryana Violence)

यावेळी मुख्यमंत्री खट्टर यांनी माहिती दिली की, या हिंसाचारात आतापर्यंत २ पोलिसांसह ६ जण ठार झाले आहेत. तर ११६ जणांना अटक करण्यात आली असून १९० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हरियाणा सरकारने हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५७ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

Haryana Violence : मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई

याशिवाय या हिंसाचारा दरम्यान अनेक गाड्या तसेच अन्य मालमत्तेचे नुकसान झाले आहे. ज्यांनी या हिंसाचारात आपली मालमत्ता गमावली, त्यांना दंगलखोरांकडून नुकसान भरपाई मिळेल, असे खट्टर यांनी सांगितले. याविषयी खट्टर यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकार केवळ सरकारी मालमत्तेच्या नुकसान भरपाई देईल. मात्र, खाजगी मालमत्तेचे झालेले नुकसान भरपाई देण्यास सरकार जबाबदार नाही.

याविषयी अधिक माहिती देताना खट्टर म्हणाले की, "आम्ही एक कायदा केला आहे ज्यामध्ये सरकारी मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई दिली जाते. परंतु जिथे खाजगी मालमत्तेचा संबंध आहे. ज्यांनी नुकसान केले आहे ते नुकसान भरपाईसाठी जबाबदार आहेत. त्यामुळे, आम्ही सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची तरतूद करू आणि खाजगी मालमत्तेसाठी, त्यासाठी जबाबदार असलेल्यांकडून भरपाई वसूल केली जाईल, दंगलखोरांची ओळख पटवली जाईल आणि नूह आणि गुरुग्राममधील जमावाच्या हिंसाचारात खाजगी मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई केली जाईल."

'मोनू मानेसर' विषयी खट्टर काय म्हणाले?

दरम्यान, या उफाळलेल्या हिंसाचाराला मोनू मानेसर याची काही वक्तव्ये जबाबदार आहेत, असे काही मीडिया रिपोर्ट्सची माहिती आहे. तर यावर बोलताना खट्टर म्हणाले, मोठ्या प्रमाणावर हिंसाचार कशामुळे झाला याबद्दल बोलताना खट्टर म्हणाले की अधिकारी या घटनेची चौकशी करत आहेत आणि सध्या कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT