पुढारी ऑनलाईन : गुगलसारख्या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये काम करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. या कंपनीत मिळणाऱ्या पगाराच्या पॅकेजची अनेकदा चर्चाही होत असते. आताही चर्चा आहे ती पुण्याच्या हर्षल जुईकरची. हर्षलला नुकतीच गुगलमध्ये नोकरी मिळाली. वार्षिक 50 लाखांचं पॅकेजही त्याला गुगलने देऊ केलं आहे. हर्षल एमआयटी – वर्ल्ड पीस विद्यापीठाचा विद्यार्थी आहे.
हर्षलच्या या यशाचा गवगवा होण्याचं कारणही तितकंच खास आहे. कारण असं पॅकेज मिळवणारा हर्षल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट नाही. खरं तर गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी इंजिनिअरिंगची पदवी घेतलेले अनेकजण प्रयत्नशील असतात. पण हर्षलने मात्र ही चौकट मोडली आहे. कोडिंग आणि प्रोग्रामिंगमध्ये हर्षलला आधीपासूनच रस होता. यानंतर त्याने ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये एमएससी केलं. हर्षलच्या आवडीने त्याच्या ध्येयाची दिशा सुकर केली. त्याच्या कोडिंग आणि प्रोग्रामिंगमधील आवडीने त्यांना गुगलशी जोडलं. त्याच्यातील कोडिंगची प्रतिभा पाहून गुगलनेही त्याला नोकरी देऊ केली. करियरची नेहमीची वाट सोडून इतर वाटा निवडताना नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा असेल तर यश मिळवणं अवघड नाही हेच हर्षलच्या उदाहरणावरून दिसून येतं.
हेही वाचा :