Latest

Harley Davidson : ‘या’ बाईकवर लागली ७.७३ कोटींची बोली; हार्ले डेविडसनच्या ११५ वर्षांच्या मॉडेलचे फोटो व्हायरल

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्हाला जगातील सर्वात महागड्या बाईकचे नाव माहित आहे का? किंवा आतापर्यंतच्या सर्वात महागड्या बाईकची किंमत माहित आहे का? ५० लाख, फार फार तर एक कोटी रुपये इतक्या किंमतीच्या बाईक तुमच्या ऐकण्यात आल्या असतील. मात्र तुम्ही विचार पण करु शकणार नाही इतक्या किंमतीला एका बाईकची विक्री झाली आहे. त्यामुळे विक्री झालेले हे मॉडेल सध्या खूप चर्चेत आहे. हार्ले डेविडसन (Harley Davidson) कंपनीची बाईक ही जगभरातील सर्वात महागडी बाईक म्हणून ओळखली जाते. त्यांच्या एका विंटेज मॉडेलवर ७.७३ कोटी रुपयांची बोली लागली आहे. या बोलीमुळे हार्ले डेविडसनची जुनी बाईक चर्चेत आली. या बाईकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हार्ले डेविडसन (Harley Davidson) कंपनीची ही विंटेज बाईक ११५ वर्षांपूर्वीची आहे. अमेरिकेच्या लॉस वेगास या शहरात या बाईकची लिलाव प्रक्रिया पार पडली. १९०८ सालचे हे जुने मॉडेल आहे.

लिलाव प्रक्रिेयेदरम्यान ९,३५,००० अमेरिकन डॉलर इतकी यावर बोली लागली. म्हणजेच ७,७३,१७,०२० रुपये इतके त्याचे भारतीय मुल्य आहे. साडे सात कोटीहून अधिक किंमतीच्या लिलावाच्या बोलीमुळे ही सर्वात महागडी बाईक बनली आहे. स्ट्रॅप टँक असे या मॉडेलचे नाव आहे.

जाणून घ्या : हार्ले डेविडसनच्या या जुन्या मॉडेलचे 'स्ट्रॅप टँक' कसे पडले?

गेल्या महिन्यात लॉस वेगासमध्ये Mecum Auctions ने ऑक्शन इवेंट आयोजित केलेला होता. FOX Business यांनी दिलेल्या माहितीनुसार, विंटेज बाईकची (Harley Davidson) विक्री करणाऱ्या Vintagent या वेबसाईटचा संदर्भ देऊन मॅकम ऑक्शन्सने (Mecum Auctions) फेसबुकवर या स्ट्रॅम्प बाईकचे फोटो पोस्ट केलेले होते.

बाईकची इंधन टाकी ही निकेल प्लेटेड बनवलेली आहे. म्हणून या बाईकचे नाव स्ट्रॅप टँक असे ठेवलेले आहे. या बाईकला चालवण्याचा आनंद घेणारे लोक कमी असले तरी या बाईकचे चाहतावर्ग खूप मोठा आहे.

Harley Davidson

महागड्या मॉडेलच्या फक्त 12 बाईक उपलब्ध

1908 मध्ये हार्ले-डेव्हिडसनने या मॉडेल्सच्या केवळ 450 युनिट्सची निर्मिती केली होती. मात्र आता यापैकी फक्त 12 बाईक उपलब्ध असल्याची माहिती आहे.

ही बाइक 1941 मध्ये विस्कॉन्सिनच्या एका शेतात डेव्हिड उहलीन यांना आढळून आली होती. डेव्हिड यांनी ही बाइक स्वतःजवळ 66 वर्षांपर्यंत ठेवली होती. नंतर या बाइकचे नुतनीकरण करण्यात आले, ज्यात याची टँक, चाकं, सीट कव्हर आणि इंजिन बेल्ट पुलीची दुरुस्ती करण्यात आली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT