Latest

Hardik Pandya : हार्दिक पंड्या टीम इंडियाचा नवा कर्णधार, आयर्लंड दौऱ्यासाठी संधी : रिपोर्ट

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि आयर्लंड (IND vs Ireland) यांच्यात दोन सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी आयर्लंडच्या संघाने आपला संघ जाहीर केला आहे. दरम्यान, भारतीय संघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या कर्णधार पदाची जबाबदारी अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे (hardik pandya) सोपली जाण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्याला (hardik pandya) आता भारतीय संघात मोठी जबाबदारी मिळणार आहे. भारतीय संघ सध्या ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली मायदेशात द. आफ्रिकेविरुद्ध टी 20 मालिका खेळत आहे. या मालिकेत पंतच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लगला आहे. त्यानंतर तिसरा सामना जिंकून भारताने मालिकेत कमबॅक केले. मात्र पंतच्या नेतृत्वाखाली खेळणा-या संघावर चाहत्यांस अनेक माजी क्रिकेटर नाराज आहेत.

दरम्यान, आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाला विजेतेपद मिळवून देणा-या हार्दिक पंड्याकडे (hardik pandya)आयर्लंड दौ-यात भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले जाईल अशा चर्चांना उधान आले आहे. मात्र, बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी हार्दिक आता भारतीय संघाचा कर्णधार असेल असे अनेक तज्ज्ञांना विश्वास आहे.

आयर्लंड संघाची घोषणा…

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी आयर्लंडने संघ जाहीर केला आहे. यात अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), मार्क अॅडायर, कर्टिस कॅम्पर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, जोश लिटल, अँड्र्यू मॅकब्राईन, बॅरी मॅककार्थी, कोनर ओल्फर्ट, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर आणि क्रेग यंग यांचा समावेश आहे.

भारतीय क्रिकेट बोर्डाने अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. या दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचे प्रशिक्षक असतील. तर, इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी राहुल द्रविड कसोटी संघासोबत असेल.

SCROLL FOR NEXT