Latest

पत्नीच्या जाचाला कंटाळून महिनाभरापासून तो राहतोय ८० फूट उंच ताडाच्या झाडावर 

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : पत्नीच्या वाद आणि मारहाणीला (Harassment) कंटाळलेला एक माणूस गेल्या महिनाभरापासून 80 फूट उंच ताडाच्या झाडावर राहत आहे. ही विचित्र घटना उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील कोपागंज भागातील आहे.

४२ वर्षीय राम प्रवेश या व्यक्तीचे गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या पत्नीशी भांडण होत होते. पत्नीने आपल्याला वेळोवेळी मारहाण केल्याचा आरोपही त्याने केला आहे. पत्नीच्या अपमानाने तो इतका नाराज झाला की तो झाडावर चढला आणि महिनाभरापासून तिथेच राहत आहे. त्याचे कुटुंब दोरीने बांधून झाडाजवळ अन्न आणि पाणी लटकवतात, राम तो वरून ओढतो.

Harassment : गावकऱ्यांचा  आक्षेप

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, राम प्रवेश हा रात्री कधीतरी झाडावरून खाली उतरतो आणि शौच करून पुन्हा झाडावर चढतो. गावकऱ्यांनी राम प्रवेशला खाली येण्यास सांगितले पण त्याने नकार दिला आहे. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. पण विनंती करूनही राम प्रवेशने त्यांचे ऐकले नाही, तेव्हा त्यांनी त्याचा व्हिडिओ बनवला आणि तेथून निघून गेले.

गावप्रमुख दीपक कुमार म्हणाले, "गावकऱ्यांनी रामला पामच्या झाडावर राहण्यावर आक्षेप घेतला असून, त्याच्या शेजारी अनेक घरे आहेत. लोक त्यांच्या घरात काय करत आहेत ते तो पाहत राहतो आणि त्याचा त्यांच्या गोपनीयतेवर परिणाम होतो. याबाबत गावातील अनेक महिलांनी येऊन आमच्याशी चर्चा केली आहे. आम्ही पोलिसांना याची माहिती दिली पण ते आले, व्हिडिओ बनवून निघून गेले."

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT