पिंपरी : बाईक रॅली सोन्या काळभोर टोळीच्या अंगलट, सोशल मीडियावर व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केला गुन्हा दाखल  | पुढारी

पिंपरी : बाईक रॅली सोन्या काळभोर टोळीच्या अंगलट, सोशल मीडियावर व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केला गुन्हा दाखल 

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: शक्ती प्रदर्शन करण्यासाठी बाईक रॅली काढून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणे आकुर्डीतील सोन्या काळभोर टोळीच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणात गुरुवारी (दि. २५) निगडी पोलिस ठाण्यात १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवन सातपुते (रा. गंगानगर, आकुर्डी) याच्यासह अन्य १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार जमीर तांबोळी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार जीवन सातपुते हा आकुर्डीतील सोन्या काळभोर टोळीचा सक्रिय सदस्य आहे. नुकताच तो मोक्याच्या गुन्ह्यातून तुरुंगातून सुटला आहे. दरम्यान, १७ जून रोजी सातपुते याने साथीदारांना घेऊन खंडोबा चौक ते शितळा देवी चौक अशी बाईक रॅली काढली होती. त्यानंतर रॅलीचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिल्मी डायलॉग, गण्यासह व्हायरल केले. पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या हा व्हिडिओ हाती लागल्यानंतर गुरुवारी (दि.२५) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button