Latest

Navratri 2023 : मंगलमय नवरात्रौत्सव आजपासून

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आदिशक्तीच्या आगमनाच्या निमित्ताने देवीची मंदिरे विद्युतरोषणाईने उजळली आहेत. फुलांचे तोरण, रंगबिरंगी पताके आणि आकर्षक फुलांच्या सजावटीने मंदिरांना वेगळेच रूप प्राप्त झाले असून, रविवारी (दि.15) उत्साहपूर्ण आणि भक्तिपूर्ण वातावरणात नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे.

संबंधित बातम्या :

सकाळी मंदिरांमध्ये विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होणार असून, घरोघरीही विधिवत पद्धतीने घटस्थापना करण्यात येणार आहे. नवरात्र उत्सवानिमित्त सगळीकडे चैतन्याची, उत्साहाची लहर आहे.

मुहूर्त दुपारी पावणेदोनपर्यंत

रविवारी पहाटे पाचपासून ते दुपारी एक वाजून 45 मिनिटांपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल, असे दाते पंचांगाचे मोहन दाते यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT