पुढारी ऑनलाईन डेस्क : हिरवागार निसर्ग, बोचणारी थंडी, वरच्या मजल्यापासून छतापर्यंतच्या काचेच्या खिडक्या आणि सभोवताली पाचगणीच्या (HBD Urmila Matondkar) लक्ष वेधून घेणाऱ्या टेकड्या अशा ठिकाणी उर्मिला मातोंडकरचा फार्महाऊस आहे. हे सुंदर ठिकाण आहे-पाचगणी. आज ४ फेब्रुवारी रोजी उर्मिलाचा वाढदिवस आहे. तुम्हाला माहिती आहे, उर्मिलाचा फार्महाऊस आतून कसा दिसतो? (HBD Urmila Matondkar)
उर्मिला मातोंडकरची चित्रपटसृष्टीतील वाटचाल रंजक आहे. तिच्या कारकिर्दीत तिने बॉलिवूडमध्ये केवळ एक प्रमुख स्टार म्हणून स्वत: ला प्रस्थापित केले नाही तर तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्येही ओळख मिळवली. चित्रपट रंगीला (१९९५) ते जुदाई (१९९७) ते खूबसुरत (१९९९) पर्यंत, उर्मिलाने एकापेक्षा एक चित्रपट दिले. तिला तिच्या अमूल्य योगदानासाठी अनेक पुरस्कारदेखील मिळाले.
उर्मिला मातोंडकरने इतर अनेक स्टार्सप्रमाणेच कोविड-१९ मुळे २०२० मध्ये चा बहुतांश काळ घरी घालवला होता. तिने तिचा पती मोहसिन अख्तर मीर आणि त्यांच्या पाळीव कुत्र्यांसोबत पाचगणीतील फार्महाऊसमध्ये भरपूर वेळ घालवला होता.
फरशीपासून छतापर्यंत आणि सर्व खिडक्यांना क्रीम कलरचे हलके पडदे आहेत. लिव्हिंग रुममध्ये लाईट कलर देण्यात आला आहे. एक लाकडी चौरंग सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. बाजूला एक चिमइई दिसते. ज्यामध्ये थंडीतदेखील खोली गरम राहिल, यासाठी ती चिमणीची व्यवस्था करण्यात आलीय.
एक आरामदायी लाकडी सोफा असून साईड टेबल आणि बेज आर्मचेयरही दिसते. एक काचेचे कॉफी टेबल आलीशान बंगल्याला आणखी सुंदर बनवते. बहुरंगी गालीचा आणि काचेचे बाऊल्स त्या खोलीच्या सुंदरतेत आणखी भर टाकताना दिसतात.
एक दगडाचा स्तंभ बैठकीच्या व्यवस्थेपासून डायनिंग रूमला वेगळं करतो. ऑफ-व्हाईट कव्हर असलेला एका दगडी रंगाचा टेबल आणि खुर्च्या सर्व काही आलिशान आहे. संगमरवरीच्या फरसीवर चेस्टनट ब्राऊन पॅटर्न लाकडी खुर्च्या उठावदार दिसतात.
लिव्हिंग रूमच्या एका कोन्यात लो-हँगिंग लॅम्प पाहायला मिळते. रिपोर्टनुसार, उर्मिला आणि मीर मुख्य सण-उत्सवावेळी या फार्महाऊसला भेट देतात. यावेळी सुंदर मेणबत्त्या आणि फुलांनी बंगला सजवण्यात येतो.