Latest

HBD Rajinikanth : ‘तू माझ्या चित्रपटात काम करशील? जाणून घ्या शिवाजीराव गायकवाडचा प्रवास

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण चित्रपटसृष्टीत 'थलैवा' या नावाने प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. १२ डिसेंबर, १९५० रोजी बंगळुरूमध्ये रजनीकांत यांचा जन्म झाला होता. (HBD Rajinikanth) आज त्यांचा ७२ वा वाढदिवस आहे. तुम्हाला माहितीये का, रजनीकांत यांचे मुळचे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. रजनीकांत एक बस कंटक्टर ते दक्षिण भारतीय सुपरस्टार कसे झाले? (HBD Rajinikanth)

रजनीकांत यांनी मनोरंजन क्षेत्रात जवळपास ३० वर्षे अभिनय केला आहे. या काळात त्यांनी दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.

रजनीकांत बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाड कसा झाला?

घरच्या गरीब आर्थिक परिस्थितीमुळे, रजनीकांत यांनी सुरुवातीला कुली म्हणून काम केले आणि नंतर त्यांना बस कंडक्टरची नोकरी मिळाली. त्यावेळी त्यांना महिन्याला ७५० रुपये मिळायचे. तिकीट कापण्याची आणि बसमध्ये शिट्ट्या वाजवण्याची त्यांची अनोखी शैली एका दिग्दर्शकाच्या लक्षात आली. त्यावेळी त्यांनी रजनीकांत यांना त्यांच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती.

रजनीकांतचा सुपरस्टार होण्याचा प्रवास खडतर होता. या प्रवासात अनेक चढ-उतार आले. रजनीकांत यांनी अभिनय क्षेत्रात लोकांना मदत करून आपल्या नावापेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई केली आहे. रजनीकांत यांनी १९७४ मध्ये फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला होता आणि 'अपूर्व रागांगल' हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला.

खलनायक ते नायक

रजनीकांत यांचा चित्रपटसृष्टीतला प्रवास खलनायक म्हणून रुपात प्रेक्षकांसमोर आला होता. 'ओरू केल्विकुरी' हा त्याचा नायक म्हणून पहिला चित्रपट होता. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 'बाशा', 'मुथु', 'अन्नामलाई', 'अरुणाचलम', 'थलाइवी' हे त्यांचे चित्रपट सुपरहिट झाले आहेत.

रजनीकांत यांचा चित्रपट लव्हस्टोरी

साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. रजनीकांतने त्यांच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान असलेल्या लता रंगाचारीशी लग्न केले आहे. लता कॉलेजमध्ये असताना तिने एका मासिकासाठी रजनीकांत यांची मुलाखत घेतली. मुलाखतीनंतर रजनीकांत आणि लता यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी १९८१ मध्ये लग्न केले. रजनीकांत आणि लता यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोन मुली आहेत.

रजनीकांतने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. रजनीकांतला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत देव मानले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT