Latest

Happy Birthday Rahul Dravid : द्रविड गुरूजींच्‍या नावावर असलेला ‘हा’ विक्रम आजही आहे अबाधित!

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजचा (दि.11) दिवस टीम इंडियासाठी खास आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा  51वा वाढदिवस आहे. 'मिस्टर वॉल' म्हणून प्रसिद्ध असलेले राहुल द्रविड यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत;  पण त्‍यांच्‍या नावावर असाच एक विक्रम आहे, जो आजही अबाधित आहे. हा विक्रम सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, रिकी पाँटिंग, इंझमाम-उल-हक, विराट कोहली, रोहित शर्मा यांसारखे दिग्गज आजही हा विक्रम मोडू शकले नाहीत. जाणून घेवूयात याबद्दल… (Happy Birthday Rahul Dravid)

राहुल द्रविड यांच्‍या नावावर असलेला अबाधित विक्रम

राहुल द्रविड यांनी टी-20, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद न होता सर्वाधिक 173 डाव खेळले आहेत. द्रविड यांनी 10 जानेवारी 2000 ते 6 फेब्रुवारी 2004 दरम्यान ही कामगिरी केली. कोणत्याही खेळाडूचा शुन्यावर बाद न होता इतके डाव खेळण्याचा हा सर्वोच्च क्रमांक आहे. सचिन तेंडुलकर या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांनी १३६ डाव खेळले आहेत. यामध्ये 29 ऑगस्ट 1999 ते 6 फेब्रुवारी 2004 दरम्यान द्रविड यांच्या 120 एकदिवसीय डावांचा समावेश आहे. यामध्‍ये 'मिस्टर वॉल' 0 वर एकदाही  बाद झाले नाहीत. (Happy Birthday Rahul Dravid)

अशी आहे द्रविड यांची कारकीर्द

द्रविड यांनी 164 कसोटी सामन्यांमध्ये 36 शतके आणि 63 अर्धशतकांसह 52.31 च्या सरासरीने 13288 धावा केल्या.  344 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10889 धावा केल्या आहेत यामध्‍ये 12 शतके आणि 83 अर्धशतांचा समावेश आहे. द्रविड यांच्या नावावर क्षेत्ररक्षक म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 210 झेल घेण्याचा विक्रम आहे.

भारताचे असे फक्त दोनच फलंदाज आहेत ज्यांनी कसोटी आणि वनडे फॉरमॅटमध्ये 10,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त, द्रविड यांनी कसोटीत 13,288 धावा केल्या आहेत.  ज्यात 36 शतके आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे. द्रविड यांनी वनडेमध्ये 10,889 धावा केल्या आहेत. त्यात 12 शतकांचा समावेश आहे.

डिसेंबर 2006 दौऱ्यातील जोहान्सबर्ग कसोटीत भारताने द्रविड यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आफ्रिकन संघाचा 123 धावांनी पराभव केला होता. याशिवाय द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारताने 21 वर्षांनी 2007 मध्ये इंग्लंडमध्ये कसोटी मालिका 1-0 ने जिंकली होती.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT