Latest

Hansika Motwani Wedding : हंसिका मोटवानी ४५० वर्ष जुन्या किल्ल्यात घेणार सात फेरे

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यापासून ते साऊथ चित्रपटांपर्यंत अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी लवकरच लग्न बंधनात ( Hansika Motwani Wedding ) अडकणार आहे. या शाही विवाहासाठी जयपूर येथील ४५० वर्षापूर्वीच्या जुन्या मुंडोटा किल्ल्यावर जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. परंतु, अद्याप हंसिकाचा होणार पती कोण आहे याची माहिती मिळालेली नाही.

एका रिपोर्टच्या माहितीनुसार, हंसिका मोटवानीचा येत्या डिसेंबर महिन्यात रॉयल (शाही) पद्धतीने विवाह सोहळा ( Hansika Motwani Wedding ) पार पडणार आहे. या शाही विवाहासाठी जयपूरच्या ४५० वर्षापूर्वीचा जुना आणि प्रसिद्ध मुंडोटा किल्ला निवडला आहे. येथेच विवाहाचे सर्व विधी पार पडणार आहेत. किल्लावर लग्नासाठी येणाऱ्या नातेवाईक आणि मित्रमंडळीसाठी रूम सजविण्यात येत आहेत. तसेच या विवाहासाठी जबरदस्त प्लॅनिंग केलं असून पाहूण्याच्या खाण्या- पिण्यापासून ते नववधू आणि वराचे कपडे, मेकअप, सजावट, लायटिंग, सर्व सुखसुविधाचा पुरवठा करण्यात येत आहे. तसेच या विवाहाला उपस्थित सर्व पाहुण्यांचे भव्य स्वागत केले जाणार असल्याची माहिती मिळतेय. या सगळ्या तयारीवरून विवाहाची तारिख जवळ आली असल्याचे निदर्शनास येत आहे.

पंरतु, हंसिकाच्या लग्नाची तारिख किंवा तिचा होणारा पती याबद्दल कोणतीच माहिती अद्याप समोर आलेली नाही. या सगळ्या गोष्टीची माहिती गुलदस्त्यात आहे. याच दरम्यान हंसिका एका राजकारण्याच्या मुलाशी विवाह करणार असून तो एक उद्योगपती असल्याचे बोलले जात आहे.

छोट्या पडद्यावर हंसिकाने बालकलाकार म्हणून तिच्या करिअरला सुरूवात केली. यानंतर तिने 'शाका लाका बूम बूम', 'क्योंकि सास भी कभी बहू थी' आणि 'सोन परी' या मालिकेतून बालकलाकारची भूमिका साकारली. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या 'कोई मिल गया' मध्येही तिने मुख्य भूमिका केली आहे. 'कोई मिल गया' या चित्रपटातून हंसिका प्रकाश झोतात आली. याशिवाय हिंदीसोबत हंसिकाने तमिळ इंडस्ट्रीमध्येही काम केलं आहे. 'एंगेयम कधल', 'वेलायुधम', 'ओरु कल ओरु कन्नडी', 'थीया वेलाई सिय्यानुम कुमारू' आणि 'सिंगम २' चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT