Latest

Hangzhou Asian Games : जणू हे स्वप्नचं आहे! : ३ सुवर्ण जिंकणाऱ्या नागपूरच्या ओजस देवतळेची प्रतिक्रिया

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई खेळांमध्ये तीन सुवर्णपदके जिंकल्यानंतर आणि भारताने १०० पदकांचा टप्पा गाठल्यानंतर नागपूर येथील तिरंदाज ओजस प्रवीण देवतळे याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. "मी भारतासाठी एक सुवर्णपदक जिंकण्याच्या उद्देशाने आलो होतो, परंतु तीन सुवर्णपदके जिंकल्यानंतर जणू मी स्वप्नात आहे अस वाटतं," असं त्याने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

पुरुषांच्या तिरंदाजीमध्ये भारताने सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके जिंकली. पुरुषांच्या तिरंदाजीचा अंतिम सामना भारताच्या दोन खेळाडूंमध्ये झाला. या सामन्यात भारताच्या ओजस देवतळेने सुवर्ण आणि अभिषेक वर्माने रौप्यपदक पटकावले. भारताचे हे ९८ वे आणि ९९वे पदक आहे. नागपूरच्या ओजस देवतळे याने एशियन गेम्समध्ये हे तिसरं सुवर्णपदक जिंकलं आहे. या सुवर्ण कामगिरीनंतर ओजसने हे स्वप्न असल्याचं म्हटलं आहे. "मला इतर खेळाडूंचेही अभिनंदन करायचे आहे. १०० पदके ही भारतासाठी मोठी संख्या आहे. भारताचा विकास होत आहे याचा अभिमान वाटतो. भारत सरकार, प्रशिक्षक, या सुवर्णपदकामागे माझे पालक आणि सर्व सहाय्यक कर्मचारी आहेत," असेही त्याने म्हटले आहे.

दरम्यान, वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजीमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल आणि भारताच्या १०० पदकांचा आकडा पार केल्याबद्दल तिरंदाज अभिषेक वर्मा म्हणला, "मी २०१४ मध्ये दोन पदके आणि २०१८ मध्ये एक पदक जिंकले होते. भारताची खूप चांगली प्रगती होत आहे. आम्हाला सर्व प्रकारचा पाठिंबा मिळत आहे. पुढच्या वेळी आम्ही २०० हून अधिक पदके जिंकण्याचा प्रयत्न करू," असा विश्वास त्याने व्यक्त केला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT