Latest

Hangzhou Asian Games | भारताची घौडदौड सुरुच, पुरुष कॅनो दुहेरीत अर्जुन सिंग आणि सुनील सिंग यांना कांस्य

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : भारताची आशियाई क्रीडा स्पर्धेत घौडदौड सुरुच आहे. आज भारताच्या अर्जुन सिंग आणि सुनील सिंग सलाम यांनी पुरुष कॅनो दुहेरीच्या १ हजार मीटर स्पर्धेत ३ मिनिटे ५३.३२९ सेकंदाच्या वेळेसह कांस्यपदक जिंकले. (Hangzhou Asian Games) भारताचे हे आजच्या दिवसाचे हे पहिले पदक आहे. यासह भारताच्या एकूण पदकांची संख्या ६१ झाली आहे.

संबंधित बातम्या 

उझबेकिस्तानच्या शोखमुरोद खोलमुराडोव्ह आणि नुरिसलोम तुख्तासिन उगली यांनी ३ मिनिटे ४३.७९६ सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकले, तर कझाकिस्तानच्या टिमोफे येमेलियानोव्ह आणि सर्गेई येमेलियानोव्ह यांनी ३ मिनिटे ४९.९९१ सेकंदाच्या वेळेसह रौप्यपदक जिंकले.

भारतीय जोडीने ३ मिनिटे ५३.३२९ सेकंदाची वेळ पूर्ण करून तिसरे स्थान मिळवले. विशेष म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील या स्पर्धेतील देशाचे हे केवळ दुसरे पदक आहे. १९९४ मधील हिरोशिमा येथील स्पर्धेत कॅनो दुहेरीत भारताच्या सिजी सदानंदन आणि जॉनी रोमेल यांनी कांस्यपदक जिंकले होते.

दरम्यान, तिरंदाजीत महिला कंपाउंड वैयक्तिक उपांत्य फेरीत भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम हिने आदिती गोपीचंद हिचा १४६-१४९ गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आदिती आता कांस्यपदकासाठी खेळणार आहे

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT