Latest

Gujrat High court : न्यायाधीशांकडून आधी मनुस्मृतीचे दाखले आता भगवद्गीतेचे संदर्भ; अल्पवयीन बलात्कार पीडितेचे गर्भपात प्रकरण

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Gujrat High court : गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती समीर दवे यांनी 'त्या' बलात्कार पीडित अल्पवयीन गर्भवती मुलीच्या प्रकरणात मनु स्मृतीच्या दाखल्यानंतर आता न्यायाधीशांना पीडिता आणि आरोपी यांच्यात तडजोड हवी आहे. तसेच मनुस्मृतीच्या दाखल्यानंतर आता न्यायाधीशांकडून भगवद्गीतेचे संदर्भ देण्यात आले आहे. वाचा संपूर्ण प्रकरण

गुजरातमधील एका अल्पवयीन बलात्कार पीडित मुलगी गर्भवती झाली. दरम्यानचा काळ आरोपीला पकडण्यात आणि अन्य प्रक्रियेत गेला. त्यानंतर पीडिता ७ महिन्यांची गर्भवती असताना तिच्या वडिलांनी तिचा गर्भपात करण्याची अनुमती मिळावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. कारण २४ आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा गर्भ कायदेशीर आदेशाशिवाय पाडता येत नाही.

Gujrat High court : न्यायालयाने विचारले तडजोडीची शक्यता आहे का?

या प्रकरणात गुरुवारच्या सुनावणीत न्यायालयाने विचारले की अल्पवयीन बलात्कार पीडित आणि आरोपी यांच्यात तडजोड होण्याची शक्यता आहे का?

यावर वकिलांनी खंडपीठाला सांगितले की मी यापूर्वी प्रयत्न केला होता, परंतु त्याच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. या न्यायालयाचा अधिकारी म्हणून, मी असे म्हणू शकतो की यामुळे तीन जीव वाचतील (गर्भातील बाळाचे, पीडितेचे आणि आरोपीचे जीव). वकिलांनी पुढे खंडपीठाला सांगितले की आरोपी सध्या मोरबी जिल्ह्यातील कारागृहात आहे.

यावर खंडपीठाने उत्तर दिले, "मला त्याला फोन करून विचारू द्या. मी त्याच्याकडून (तडजोड होण्याची शक्यता असल्यास) खात्री करून घेईन. सध्या मी फक्त शक्यतांचा विचार करत आहे. ते पुढे असेही म्हणाले की, माझ्या मनात काय चालले आहे ते मी इथे सांगत नाही. मात्र तिथे अनेक सरकारी योजना आहेत. त्याला येऊ द्या त्याच्याशी बोलू."

न्यायमूर्तींनी बलात्कार पीडितेच्या वकिलाला पुढील सुनावणीच्या तारखेला पीडितेला न्यायालयात आणण्याचा सल्लाही दिला. त्यानुसार खंडपीठाने सुनावणी शुक्रवारी सायंकाळपर्यंत तहकूब केली.

Gujrat High court : मनुस्मृतीच्या दाखल्यांमुळे न्यायमूर्तींवर टीका

या प्रकरणात न्यायमूर्ती दवे, यांनी मनुस्मृतीचे दाखले देत पूर्वी १५-१६ वर्षात मुलींचे लग्न होऊन त्या वयाच्या १७ व्या वर्षी पहिल्या अपत्यांना जन्म द्यायच्या. तुम्ही तुमच्या आजींना विचारा किंवा मनुस्मृती वाचा. मुली मुलांपेक्षा खूप अगोदर परिपक्व होतात, असे ते म्हटले होते. न्यायमूर्ती दवे असेही म्हटले होते की जर वाचलेली पीडित व्यक्ती आणि गर्भाची स्थिती चांगली असेल तर न्यायालय गर्भधारणा संपवण्याची परवानगी देऊ शकत नाही.

Gujrat High court : मनुस्मृतीनंतर न्यायमूर्तींकडून भगवद्गगीतेचे दाखले

दरम्यान, त्यांच्या मनुस्मृतीच्या दाखल्यांमुळे ते मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते तसेच त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. गुरुवारच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती समीर दवे म्हणाले की सुनावणीची काही निरीक्षणे चुकीच्या पद्धतीने घेण्यात आली आहेत. त्यावर मी एवढेच म्हणेन की न्यायाधीश हे स्थितप्रज्ञासारखे असावेत. यासाठी त्यांनी भगवद्गीतेचा संदर्भ दिला. ज्याची व्याख्या भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात केली आहे. याचा अर्थ स्तुती असो की टीका, त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. म्हणून माझा ठाम विश्वास आहे की न्यायाधीश हा स्थितप्रज्ञासारखाच असावा. " न्यायमूर्ती दवे यांनी अधोरेखित केले.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT