पुढारी ऑनलाईन डेस्क : Gujrat Election : ज्या पक्षाकडे विकासाचे व्हिजन किंवा रोडमॅप नाही अशा काँग्रेसवर मते का वाया घालवायची. तुमची मते वाया घालवू नका, पुढील महिन्यात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची निवड करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमरेली जिल्ह्यातील जनतेला केले.
Gujrat Election : गुजरात निवडणूक प्रचाराच्या दुस-या दिवशी अमरेली येथे सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधी पक्ष या प्रदेशासाठी कधीही चांगले करू शकत नाहीत. काँग्रेसने २०१७ च्या निवडणुकीत अमरेली जिल्ह्यातील धारी, अमरेली, लाठी, सावरकुंडला आणि राजुला या पाचही विधानसभा मतदारसंघांवर विजय मिळवला होता. भाजपला एकही जागा मिळवता आली नाही. भाजपने गुजरातला मजबूत करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. आता मोठी झेप घेण्याची वेळ आली आहे. काँग्रेसमध्ये ते करण्याची क्षमता नाही. विरोधी पक्ष तुमच्यासाठी कधीही चांगले करणार नाही.
Gujrat Election : काँग्रेसचा नेता तुम्हाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाईल, अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. कोणत्याही काँग्रेस नेत्याला विकासाचा रोडमॅप काय आहे, हे विचारा; त्यांच्याकडे कोणतीही योजना नाही. अमरेलीतील जनतेने गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या आशेने निवडून दिले होते, पण त्यांनी पाच वर्षात तुमच्यासाठी काय केले? त्यांचे एक तरी काम तुम्हाला आठवते का? मग तुम्ही त्यांच्यासाठी मतं का वाया घालवत आहात? अमरेली मजबूत करण्यासाठी भाजपला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
Gujrat Election : पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत गुजरातमधील ६० लाख शेतकऱ्यांना १२ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. तुम्ही काँग्रेसकडून अशा गोष्टींची अपेक्षा करू शकत नाही. कोणत्याही काँग्रेस नेत्याकडे विकासाचा रोडमॅप नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :