Shradha Murder Case : 'तिच्या' जबड्याचा तुकडा सापडला; तलाव उपसण्याचे काम सुरू | पुढारी

Shradha Murder Case : 'तिच्या' जबड्याचा तुकडा सापडला; तलाव उपसण्याचे काम सुरू

नवी दिल्ली : Shradha Murder Case : श्रद्धा वालकर खून प्रकरणात पोलिसांची तपास मोहीम वेगात आली असून मेहरोलीच्या जंगलात त्यांना मानवी जबड्याचा खालचा भाग व काही हाडे हाती लागली असून ती श्रद्धाची आहेत का याची खातरजमा करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. दुसरीकडे आफताब पूनावालाच्या जबानीनंतर मेहरोली जंगलानजीकच्या मैदानगढी तलावात शरीराचे तुकडे शोधण्यासाठी तलावातील पाणी उपसण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Shradha Murder Case : आफताब पूनावालाच्या जबानीत प्रत्येक शब्दाची खातरजमा करण्याचे किचकट काम पोलिसांना करावे लागत आहे. त्याने जेथे शरीराचे तुकडे फेकले असे सांगितले, त्या सगळ्या ठिकाणी पोलिसांची पथके शोध घेत आहेत. त्या मोहिमेतच रविवारी मेहरोलीच्या जंगलात एका मानवी कवटीचा खालचा जबड्याजवळचा भाग आणि काही मानवी हाडे सापडली. ही हाडे श्रद्धाचीच आहेत का हे तपासण्यासाठी ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. आफताबने काही भाग मेहरोलीत एका तळ्यात टाकल्याचे म्हटले होते. पोलीस त्या मैदानगढी तलावात आता शोधकाम करणार आहेत. त्यासाठी तलावातील पाणी उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तिकडे गुरुग्राममधील आफताबच्या कार्यालयात पोलिसांनी तपास हाती घेतला. त्यात त्याच्या लॉकरमध्ये मोठ्या आकाराच्या प्लास्टिकच्या दोन काळ्या बॅगा आढळून आल्या.

Shradha Murder Case : दरम्यान, पोलिसांच्या एका पथकाने आफताबच्या छतरपूरमधील त्या फ्लॅटची कसून तपासणी केली. घराचा एक एक इंच तपासण्यात आला. त्यात श्रद्धाची एक बॅग सापडली असून त्यात तिचे काही कपडे व शूज आहेत. दुसरीकडे आफताबने खुनानंतर काही दिवसांनी तिचे काही फोटोग्राफ्स जाळून टाकल्याचे सांगितले. पोलिसांची भिस्त आफताबच्या नार्कोटेस्टवर आहे. न्यायालयाने या चाचणीची विनंती मान्य केली असून लवकरच न्यायवैद्यक प्रयोगशाळेमार्फत ही चाचणी घेतली जाईल.

हे ही वाचा :

Shradha Murder Case : महरौलीच्या जंगलात पोलिसांना मिळालेले शरीराचे दोन तुकडे कोणाचे?

Pocso Act : मुस्लिम पर्सनल लॉप्रमाणे केलेला बालविवाह ‘पोक्सो’च्या चौकटीत – केरळ उच्च न्यायालय

Back to top button