Latest

GST Revenues : जीएसटी करवसुलीत 15 टक्क्यांची वाढ, डिसेंबरमध्ये 1 लाख 49 हजार 507 कोटींची वसुली

अविनाश सुतार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- सरत्या डिसेंबर महिन्यात 1 लाख 49 हजार 507 कोटी रुपयांची वस्‍तू अणि सेवा कर ( जीएसटी ) वसुली झाली असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाकडून रविवारी देण्यात आली. डिसेंबर 2021 मधील वसुलीच्या तुलनेत यंदाच्या डिसेंबरमध्ये झालेली करवसुली 15 टक्क्यांनी जास्त आहे. तर नोव्हेंबर 2022 मध्ये 1 लाख 45 हजार 867 कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली होती.

वस्तू आणि सेवा कर (GST) महसूल डिसेंबर 2022 मध्ये सुमारे 1.5 लाख कोटींवर पोहोचला. नोव्हेंबरच्या संकलनापेक्षा 2.5 टक्के आणि डिसेंबर 2021 च्या तुलनेत 15 टक्क्यांनी जास्त आहे. वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 8 टक्के जास्त होता, तर देशांतर्गत व्यवहारातील महसूल (सेवांच्या आयातीसह) डिसेंबर 2021 मध्ये मिळालेल्या महसुलापेक्षा 18 टक्के जास्त होता. हा सलग दहावा महिना आहे, की जीएसटी संकलनाने १.४ लाख कोटींचा (GST Revenues) टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे.

नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये झालेली जीएसटी करवसुली 3 हजार 640 कोटी रुपयांनी जास्त आहे. डिसेंबरमध्ये 1 लाख 49 हजार 507 कोटींची करवसुली झाली. त्यात केंद्रीय जीएसटी कराचा वाटा 26 हजार 711 कोटी रुपयांचा तर राज्य जीएसटी वसुलीचा वाटा 33 हजार 357 कोटी रुपयांचा आहे. याशिवाय इंटिग्रेटेड जीएसटीच्या माध्यमातून 78 हजार 434 कोटी रुपये वसूल झाले. उपकरांच्या माध्यमातून 11 हजार 5 कोटी रुपयांची वसुली झाली असल्याची माहितीही अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. गत नोव्हेंबर महिन्यात 7.9 कोटी ई – वे बिले जारी करण्यात आली. तत्पूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये 7.6 कोटी ई-वे बिले जारी करण्यात आली होती.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT