केंद्र सरकारने जनतेच्या आर्थिक सुबत्तेसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना आणल्या आहेत. यात गुंतवणूक करत आपण समाधानकारक बँक बॅलन्स उभारू शकतो. (Post Office's 'Gram Suruksha Yojana') अर्थात या योजनेत खूप गुंतवणूक करण्याची गरज नाही. आपण दररोज काही रुपये वाचवत चांगला फंड उभा करू शकता. टपाल खात्याची अशीच एक योजना असून ती सहजपणे लखपती करू शकते.
आपल्याला भरभक्कम फंड उभा करायचा असेल आणि श्रीमंत व्हायचे असेल, तर दमदार परतावा देणार्या योजनेत पैसे गुंतवावे लागतील. नोकरी आणि व्यवसाय करण्याबरोबरच बचतही करणे तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच बचत केलेले पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवणेदेखील आवश्यक आहे. यानुसार लवकर गंगाजळी उभा करू शकतो. सरकारनेदेखील अनेक बचत योजना आणल्या असून, त्या चांगल्या परताव्यासह अनेक सुविधा प्रदान करतात. टपाल खात्याच्या ग्रामीण सुरक्षा योजनेचा विचार केला, तर त्यात खूप गुंतवणूक करण्याची गरज नाही. दररोज काही पैसे बाजूला काढून ठेवले तर चांगला बँक बॅलेन्स उभा राहू शकतो.
'ग्रामसुरक्षा योजना' म्हणजे काय?
लोकांना दमदार परतावा देणारी ही योजना टपाल खात्याची आहे. (Post Office's 'Gram Suruksha Yojana') या योजनेला भारत सरकारचे पाठबळ आहे. त्यामुळे या योजनांतील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. इंडिया पोस्ट हे ग्रामीण भागात राहणार्या जनतेला पैसे जमा करण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. टपाल खाते हे ग्रामीण भागातील जनतेचा पैसा वाचवणे आणि त्यांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करण्याची भूमिका बजावते. देशातील लोकांची गरज ओळखून टपाल खात्याने अनेक प्रकारच्या जोखीममुक्त बचत योजना सुरू केल्या. या योजना चांगल्या परतावा देतात. पैकीच 'ग्राम सुरक्षा योजने'चा उल्लेख करावा लागेल. पोस्ट ऑफिसने 'रूरल पोस्टल लाइफ इन्श्युरन्स पॉलिसी'ला 1995 मध्ये लाँच केले. 'ग्रामसुरक्षा योजना' केवळ 50 रुपयांच्या मासिक हप्त्यावर 35 लाख रुपयांपर्यंत परतावा देणारी विमा पॉलिसी उपलब्ध करून देते.
कोण करू शकते गुंतवणूक?
पोस्ट ऑफिसच्या 'ग्रामसुरक्षा योजने'त (Post Office's 'Gram Suruksha Yojana') कोणताही भारतीय नागरिक गुंतणूक करू शकतो. गुंतवणूक करणार्यांचे वय 19 ते 55 दरम्यान असणे गरजेचे आहे. या योजनेत मॅच्योरिटीची रक्कम ही कमाल 80 वर्षांपर्यंत मिळू शकते. यात वार्षिक दहा हजारांपासून दहा लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. आपण तिमाही, सहामाही, वार्षिक आधारावर पैसे जमा करू शकता. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे पाच वर्षांच्या कव्हरेजनंतर तिचे विमा पॉलिसीत रूपांतर होते.
कर्जाची सुविधा
'ग्रामसुरक्षा योजने'वर गुंतवणूकदारांना कर्जाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ हा चार वर्षांनंतर मिळतो. पॉलिसी (Post Office's 'Gram Suruksha Yojana') खरेदी केल्यानंतर तीन वर्षांनंतरही जमा (सरेंडर) करता येते. आपण पॉलिसी पाच वर्षांच्या आत बंद करत असाल, तर बोनसपासून वंचित राहाल.
अभिमन्यू सरनाईक
हेही वाचा ;