Latest

TET Exam : २०१३ पूर्वीच्या शिक्षकांना मोठा दिलासा! पदोन्नतीसाठी टीईटी अट रद्द

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पदवीधर शिक्षक पदोन्नतीबाबत केंद्र शासनाचे एनसीटीएच्या अधिसूचनेनुसार 2013 पूर्वीच्या शिक्षकांना लादलेली टीईटीची अट आता काढण्यात आली आहे. यासंदर्भातील सूचना शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षण संचालनालयास दिल्या आहेत. ही अट काढल्याने यामुळे 2013 पूर्वी शिक्षक झालेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या : 

राज्यातील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये नियुक्तीसाठी शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. परंतु आता पदोन्नती प्रक्रियेसाठीही राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेच्या (एनसीटीई) अधिसूचना काढून बंधन घातले होते. प्रत्यक्षात टीईटी परीक्षेची अंमलबजावणी 2013 पासून सुरू झाली. पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षक हे 2013 पूर्वी सेवेत लागले आहेत. यातील कोणाकडेही आता टीईटी प्रमाणपत्र नाही. त्यामुळे विषय शिक्षक म्हणून नेमके कुणाला पदोन्नत करावे, हा प्रश्न होता.

यासंदर्भातील विविध संघटनांनी यासंदर्भात निवेदन दिले होते. यानंतर शालेय शिक्षण विभागाने 25 ऑक्टोबर 2023 रोजी अशा शिक्षकांना पदोन्नती /वेतनोन्नती देताना राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेने त्या पदाकरिता विहित शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी वगळता पूर्ण केलेली असणे बंधनकारक असून याचे पालन होईल याबाबतची दक्षता आपल्या स्तरावरून घेण्यात यावी अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयास दिल्या आहेत.

टीईटी परीक्षेची अट शिथिल करावी, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड व राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT