रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रा थांबवली, म्हणाले, ‘मराठा आरक्षणाला पाठिंबा’ | पुढारी

रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रा थांबवली, म्हणाले, 'मराठा आरक्षणाला पाठिंबा'

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढली होती. मात्र, ४ दिवसानंतर ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे. पुणे ते नागपूर अशी ८०० किलोमीटरची ही युवा संघर्ष यात्रा ४२ दिवस चालणार होती. शुक्रवारी (दि.२७) रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत युवा संघर्ष यात्रा थांबवत असल्याची घोषणा केली आहे.

रोहित पवार म्हणाले, युवा संघर्ष यात्रेबाबत काल आम्ही चर्चा केली. मराठा समाजाला आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे, या हेतूने ही यात्रा स्थगित करत आहे. युवा संघर्ष यात्रा महाराष्ट्रातील नागरिकांच्या हितासाठी काढलेली आहे. आज या यात्रेचा चौथा दिवस आहे. २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी याबाबत चर्चा केली होती.

तरुणांच्या, व्यावसिकाच्या आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली होती. महाराष्ट्रातील युवकांचा संघर्ष खुप मोठा आहे. त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी लोकांमध्ये जावा, असे शरद पवार म्हणाले होते. त्यामुळे ९ ऑक्टोबर रोजी आम्ही युवा संघर्ष यात्रा काढणार असे जाहीर केले होते, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केली.

हेही वाचलंत का?

Back to top button