Latest

YouTube channels : देशाविरोधात प्रचार करणाऱ्या 20 यूट्यूब चॅनेलवर बंदी, २ वेबसाईटवरही प्रतिबंध

नंदू लटके

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा

देशाविरोधात प्रचार करणाऱ्या 20 यूट्यूब चॅनेलवर ( YouTube channels )  बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय दोन वेबसाईटवरही प्रतिबंध घालण्यात आले आहेत. केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून बंदी घालण्यात आलेले बहुतांश यूट्यूब चॅनेल्स पाकिस्तानातून चालविण्यात येत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

YouTube channels : आयटी कायदा 2021 नुसार कारवाई

यूट्यूब हे गुगलच्या मालकीचे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. देशाविरोधात प्रचार केल्याचा आरोप करीत सरकारने आयटी कायदा 2021 नुसार 20 यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्याची कारवाई केली आहे. याशिवाय दोन वेबसाईटवरही प्रतिबंध घालण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेच्या हे यूट्यूब चॅनेल्स व वेबसाईटवर देशाविरोधात प्रचार करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यातील एका यूट्यूब चॅनेलचे नाव 'नया पाकिस्तान' असे असून त्याचे दोन दशलक्ष सदस्य आहेत.

कृषी कायद्यांपासून ते काश्मीर आणि अयोध्येच्या विषयावर खोटी माहिती पसरविण्याचे काम हे चॅनेल करते. विशेष म्हणजे बंदी घालण्यात आलेल्या 20 पैकी 15 यूट्यूब चॅनेलची मालकी 'नया पाकिस्तान' ग्रुपकडे आहे.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT