Latest

Restricted imports of laptops | लॅपटॉप, टॅबलेट आणि पर्सनल कॉम्प्युटर्सच्या आयातीवर निर्बंध, केंद्राकडून आदेश जारी

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लॅपटॉप, टॅबलेट, अल्ट्रा स्मॉल फॅक्टर कॉम्प्यूटर्स, सर्व्हर्स तसेच पर्सनल कॉम्प्युटर्सच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. वरील वस्तू 'एचएसएन ८७४१' श्रेणीत येत असल्याने त्यावर निर्बंध घातले जात असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. (Restricted imports of laptops)

वरील वस्तुंच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले असले तरी २० वस्तुंच्या प्रत्येक कन्साईनमेंटला काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. संशोधन आणि विकास, टेसि्टंग, बेंचमार्किंग, इव्हॅल्यूशन, दुरुस्ती आणि इतर कामांसाठी जर वरील वस्तू लागणार असल्या तर त्याची आयात करता येईल. मात्र काम संपल्यानंतर त्या वस्तूंची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी लागेल, असे विदेश व्यापार महासंचालनालयाकडून (डीजीएफटी) सांगण्यात आले आहे.

वरील वस्तुंच्या आयातीवर घालण्यात आलेल्या निर्बंधाचा सर्वाधिक फटका चीनला बसेल, असे मानले जात आहे. दरम्यान वरील वस्तुंच्या आयातीसाठी आगामी काळात सरकारकडून परवाना घ्यावा लागेल व कर देखील भरावा लागेल, असे आदेशात म्हटले आहे. (Restricted imports of laptops)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT