Latest

Bigg Boss 16 : गोरी नागोरी बिग बॉस बाहेर, ‘हरियाणा की शकीरा’चा प्रवास संपला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : गोरी नागोरी हिला 'हरियाणाची शकीरा' म्हणतात. जेव्हा घोरीने बिग बॉसमध्ये (Bigg Boss 16) एन्ट्री घेतली तेव्हा ती खूप गप्प बसायची. यानंतर हळूहळू ती साजिद खान आणि अब्दू रोजिक यांच्या ग्रुपमध्ये सामील झाली. या आठवड्यात गोरीला सुंबुल तौकीर आणि प्रियांका चौधरी यांच्यासह नामांकन मिळाले होते. आता गोरी शोमधून बाहेर पडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. (Bigg Boss 16)

अर्चना गौतमनंतर, या आठवड्यात घर सोडणारी गोरी ही पहिली सदस्य आहे. गोरी नागोरीच्या चाहत्यांसाठी ही बातमी थोडी धक्कादायक ठरू शकते. गोरी नागोरी हिला 'हरियाणाची शकीरा' म्हणतात. उमेदवारी मिळाल्यापासून गोरीला घरातून काढून टाकले जाईल, अशी अटकळ बांधली जात होती.

आता गोरीच्या बाद झाल्याची चर्चाही फॅन क्लबमध्ये सुरू आहे. या प्रकरणामध्ये कितपत तथ्य आहे, हे शनिवारच्या एपिसोडमध्ये कळेल. पण गोरी इतक्या लवकर शो सोडेल असे वाटले नव्हते. साजिद खान आणि अब्दूच्या गटाशी पंगा घेणे गोरीला महागात पडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खानही घोरीला तिचा दृष्टिकोण बदलण्यास सांगत होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT