Latest

Goregaon Fire : मुंबईत अग्नितांडव! दुर्घटनेतील लोकांना सर्व मदत केली जात आहे : फडणवीस

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मुंबईतील गोरेगावमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्‍यू झाला आहे. तर जवळपास ४६ लोक आगीत जखमी झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे," गोरेगाव, मुंबई येथे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल जाणून दुःख झाले, जखमींना सर्व मदत केली जात आहे."(Goregaon Fire)

Goregaon Fire : ७ जणांचा होरपळून मृत्यू

मुंबईतील गोरेगाव येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. ही आग पहाटे (दि.६) तीनच्या सुमाराल लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही आग एवढी भीषण होती की, ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर, ४६ लोक आगीत जखमी झाले आहेत. यातील ३९ जणांना एचबीटी आणि कपूर रूग्‍णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्‍यान अग्‍निशमन दल आणि पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले आहेत. ३० पेक्षा अधिक दुचाकी आणि ४ कार जळून खाक झाल्या आहेत. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

जीवितहानीबद्दल जाणून दुःख झाले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेनंतर आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे,"गोरेगाव येथे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल जाणून दुःख झाले. आम्ही बीएमसी आणि मुंबई पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि सर्व मदत केली जात आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना. त्याचबरोबर त्यांनी जखमींना लवकरात लवकर बरे होण्याची भावना व्यक्त केली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT