Latest

Poisonous Liquor : बिहारमध्‍ये विषारी दारु पिल्‍याने १३ जणांचा मृत्‍यू

नंदू लटके

बिहारमध्‍ये विषारी दारु पिल्‍याने ( Poisonous Liquor ) १३ जणांचा मृत्‍यू झाला आहे. अनेकांची प्रकृती गंभीर असल्‍याने मृतांचा आकडा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. मृतांमध्‍ये गोपालगंज जिल्‍ह्यात ६ आणि बेतिया जिल्‍ह्यातील ७ जणांचा समावेश आहे.

गोपालगंज जिल्‍ह्यातील महमदपूर पोलिस ठाण्‍याच्‍या परिसरातील ग्रामस्‍थ दारु पिली. यानंतर अनेकांची प्रकृती बिघडली. गोपालगंज आणि मोतिहारी रुग्‍णालयात त्‍यांना दाखल करण्‍यात आले. बुधवारी रात्री ( Poisonous Liquor ) आठ जणांचा मृत्‍यू झाला होता. अनेकांची प्रकृती गंभीर होती. गुरुवारी सकाळी उपचार सुरु असताना आणखी पाच जणांचा मृ्‍त्‍यू झाल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

( Poisonous Liquor ) तिघांचे डोळे निकामी

मृतांमध्‍ये बेतिया जिल्‍ह्यातील ८ जणांचा समावेश आहे. गोपालगंजमध्‍ये तिघांचे डोळे निकामी झाले आहेत. तर सात जणांची प्रकृती गंभीर आहे. यामुळे या घटनेतील मृतांची संख्‍या वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. मृत हे कुशहर, महम्‍मदपूर, मंगोलपूर, बुचेया व रसौला गावचे रहिवास असल्‍याचे प्रशासनाने सांगितले.

तुम्‍ही चिंता आणि चिंतन दोन्‍ही करु नका : राजदचा हल्‍लाबोल

बिहारमध्‍ये दारुबंदीचा निर्णय घेण्‍यामागील वास्‍तव आता समोर आले आहे. तुम्‍ही चिंता आणि चिंतन दोन्‍ही करु नका, केवळ निवडणूका कशा जिंकायच्‍या याचाच विचार करा, अशी टीका राजदचे खासदार मनोज कुमार झा यांनी केली आहे.

दारु तस्‍करांना अटक

विषारु दारु प्रकरणी जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या आदेशानुसार दारु तस्‍कर छोटेलाल साह, अशोक शर्मा, रामप्रवेश सहा आणि जितेंद्र प्रसाद या चौघांना अटक करण्‍यात आली आहे. हे चौघेही मागील काही वर्ष दारुची तस्‍करी करत होते. याप्रकरणी अन्‍य आरोपींचीही पोलिस शोध घेत आहेत.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT