Onion Prices : केंद्राच्या ‘या’ निर्णयामुळे कांदा झाला स्वस्त | पुढारी

Onion Prices : केंद्राच्या 'या' निर्णयामुळे कांदा झाला स्वस्त

author title=”नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा” image=”http://”][/author]

कांद्याचे दर (Onion Prices) स्थिर रहावेत, यासाठी बफर स्टॉकमधून 1.11 लाख टन कांदा बाजारात आणला गेला असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. यामुळे कांद्याचे प्रतिकिलोचे दर 5 ते 12 रुपयांनी कमी झाले असल्याचा दावाही करण्यात आला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील स्थानिक बाजारपेठांसह दिल्ली, कोलकाता, लखनौ, पाटणा, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, हैदराबाद, बंगळूर, चेन्नई, चंदीगड, कोच्ची, रायपूर यासारख्या बाजारात कांदा उपलब्ध करण्यात आला आहे.

पुरेशी आवक आणि बफर स्टॉकमधील पुरवठा यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांदा स्वस्त झाला असल्याचेही खाद्यान्न मंत्रालयाचे म्हणणे आहे. देश पातळीवर कांद्याचे प्रतिकिलोचे सरासरी दर चाळीस रुपयांच्या आसपास आहेत. घाऊक बाजारात हाच दर 31.15 रुपये इतका आहे. 2 नोव्हेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार बफर स्टॉकमधून 1 लाख 11 हजार 376 टन इतका कांदा जारी करण्यात आला आहे.

कांद्याचे दर घसरले (Onion Prices)

20 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये कांद्याचे प्रतिकिलोचे दर 49 रुपयांवर होते, ते आता 44 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मुंबईमध्ये हेच दर 50 रुपयांवरून 45 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. अन्य प्रमुख शहरांचा विचार केला तर कोलकाता येथे 57 रुपयांवर असलेले कांद्याचे दर 57 रुपयांवरून 45 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. चेन्नईमध्ये हे दर 42 रुपयांवरून 37 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : काय आहे लक्ष्मीपूजनाचे महत्त्व ? | Diwali laxmipoojan| diwali special

Back to top button