पुढारी ऑनलाईन: आपल्यापैकी अनेकांबरोबर बर्याचदा असे घडते की, आपण गाण्याचे नाव किंवा शब्द विसरतो. परंतु, आपल्याला त्याचे ट्युनिंग आठवते. त्याच्याशी संबंधित शब्द किंवा ओळ आपल्या मनात येईपर्यंत आपण तीच धून आपल्या मनात गुणगुणत राहतो. कधी कधी गाण्याच्या मध्यभागातील काही ओळी आपल्याला आठवतात. मात्र सुरुवातीची ओळ विसरतो. अशा परिस्थितीत यूट्यूबवर गाणी शोधणे आपल्या सर्वांना अवघड होऊन बसते. आता लवकरच ही समस्या संपणार आहे.
YouTube एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आवडते गाणे गुणगुणून शोधू शकाल. कंपनीने आपल्या 'युट्युब टेस्ट फीचर्स अँड एक्सपेरिमेंट्स' पेजवर या फीचरची माहिती दिली आहे. सध्या, हे फिचर केवळ तेच लोक वापरू करू शकतात, ज्यांच्याकडे एक्सपेरिमेंट पेजचा राइट आहे. नवीन सॉन्ग सर्च फिचर अंतर्गत गाणे शोधण्यासाठी वापरकर्त्याला प्रथम ट्यून किंवा गाण्याची कोणतीही ओळ 3 ते 4 सेकंदांसाठी गुणगुणावी लागेल. ते सबमिट केल्यानंतर युट्युब ते गाणे शोधेल आणि ते तुमच्यासमोर सादर करेल. सध्या हे फिचर चाचणीच्या टप्प्यात आहे, त्यामुळे ते अद्याप योग्यरित्या कार्य करू शकत नाही. परंतु, कंपनी ते परिपूर्ण बनविण्यावर काम करत आहे, जेणेकरून लोकांचा शोध अनुभव सुलभ होऊ शकेल. सोप्या भाषेत लोकांना हे समजले पाहिजे की तुम्ही आता व्हॉईस सर्च करत असताना, नवीन फीचरमध्येही तुम्ही असेच काहीतरी करू शकाल.
युट्युब वापरकर्त्याचा अनुभव आणखी सुधारण्यासाठी सबस्क्रिप्शन फीडमध्ये 'स्मार्ट ऑर्गनायझेशन सिस्टम' वर काम करत आहे. या अंतर्गत, तुम्ही ज्या निर्मात्याचे सदस्यत्व घेतले आहे, त्याचे काही लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी दिसतील. जेणेकरून तुम्हाला एक एक करून व्हिडिओ शोधण्याची गरज पडणार नाही. सध्या तुम्हाला युट्युबवर एखाद्या निर्मात्याचे लेटेस्ट काही व्हिडिओ पहायचे असतील, तर त्यासाठी तुम्हाला त्या निर्मात्याच्या पेजवर जाऊन एक-एक व्हिडिओ पहावे लागतात. पण लवकरच कंपनी हा त्रास कमी करणार आहे.
कंपनीने म्हटले आहे की, नवीन सॉन्ग सर्च फिल्टर चाचणी झोनमध्ये आहे. येत्या काही महिन्यांत हे फीचर अँड्रॉइड युजर्ससाठी पहिल्यांदा आणले जाईल. यानंतर, हे टूल आयफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल.
युट्युब सध्या सर्च फिल्टर व्यतिरिक्त युट्युब क्रिएट एडिटिंग ॲपची चाचणी करत आहे. या ॲप्लिकेशनच्या मदतीने युजर्स सहजपणे व्हिडिओ एडिट करू शकतील. सध्या या ॲपच्या लॉन्चबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
आता ॲपमध्ये उपलब्ध फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, वापरकर्त्यांना 16:9, 9:16 आणि 1:1 आस्पेक्ट रेशोमध्ये व्हिडिओ बनवण्याची सुविधा मिळेल. याशिवाय ॲपमध्ये अनेक ट्रान्झिशन इफेक्टही उपलब्ध असतील, ज्याचा वापर व्हिडिओमध्ये करता येईल.
हेही वाचा: